महाराष्ट्र कोष्टी समाज मंडळाचे राज्य व्यापी जनसंवाद अभियान

 

लोकदर्शन र्इचलकरंजी 👉गुरुनाथ तिरपणकर)

-महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ मुंबईच्या वतीने मंदिर भेटी व समाज बांधवांशी जनसंवाद अभियान अंतर्गत ३६मंदिरांना भेटी देण्यात आल्या आहेत,अशी माहिती महाराष्ट्र कोष्टी सेवा समाज मंडळाचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांनी दिली.महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाच्या वतीने महात्मा गांधी जयंती २आक्टोबर पासुन राज्यव्यापी समाज संघटन सक्षम करण्यासाठी धागा धागा अखंड विणूया,कोष्टी समाज एक करूया याकरिता समाज बांधवांना भेटण्यासाठी इचलकरंजी येथील श्री चौंडेश्वरी मंदिर येथे मिटींग घेऊन कोष्टी समाज संपर्क अभियानाची सुरूवात करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानुसार फलटण,बारामती,नातेपुते,म्हसवड,सांगोला,तासगाव,पलुस,कुंडल,कासेगाव,वडगाव,सरूड,सांगरूळ,कोल्हापूर,सावळज,आटपाटी,जवळा,पंढरपूर,करकम्ब,भाळवणी,सोलापूर(शहर),बार्शी,बीड,वडवणी,मानवत,परभणी,देवुळगावराजा,सातारा,ऊंब्रज,कराड इ.ठीकाणी ३६चौंडेश्वरी मंदिराना भेटी दिल्या व कोष्टी समाज बांधवांशी संवाद साधला.समाज विकासासाठी व मजबूत संघटन करण्यासाठी त्यांच्या विधायक सुचना विचारात घेतल्या व मार्गदर्शन केले.सदर संपर्क दौरा व जनसंपर्क अभियानासाठी आपल्या सोबत महासचिव श्री.रामचंद्र निमणकर,सचिव श्री.मिलिंद कांबळे,सदस्य-श्री.मनोज खेतमर,श्री.दिलीप भंडारे,श्री.शीतल सातपुते,श्री.श्रीकांत हजारे यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या व विविध ठिकाणी राज्य पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य श्री.अमोल कुमठेकर,अरूणराव गुरसाळी,कार्याध्यक्ष- डाॅ.अनिन कांबळे,राजेंद्र ढवळे,किशोर उणउणे,प्रकाश बुचडे,सचिन लोले,सुर्यकांत लोले,विजयकुमार जुंजा,दत्तात्रय ढगे,विठ्ठलराव लिपारे,सुरेश तावरे-उपाध्यक्ष अरूण लाटे,विवेक लाटे इत्यादी मान्यवरांनी समाजबांधवाशी संवाद साधला.या सर्व ठीकाणी समाज बांधवांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला,व समाज विकासाचा प्रवाहात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *