ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे नि:शुल्क जलसेवेचा शुभारंभ

 

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे शुक्रवार, १४ एप्रिल रोजी भीमजयंती निमित्त भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते फीत कापून जलसेवेचा शुभारंभ करण्यात आला.

शहर वासियांना ४ टँकर द्वारे नि:शुल्क जलसेवेच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे मागील ४ वर्षांपासून शहर वासियांना नि:शुल्क जलसेवा देण्यात येत आहे.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपा नेते संजय तिवारी, निरीक्षण तांड्रा, संतोष नुने, सिनू इसारप, हसन शेख, मल्लेश बल्ला, विवेक तिवारी, प्रवीण सोदारी, वामशी महाकाली, धनराज पारखी व मोठया संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *