उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सप्तसूत्री कार्यक्रमा अंतर्गत पनवेल तालुक्यातील आदिवासी वाड्यावर जातीचे दाखल्यांचे वाटप

 

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 24 नोव्हेंबर2022
कोंकण विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी रायगड डॉ महेंद्र कल्याणकर, उप विभागीय अधिकारी पनवेल राहुल मुंडके, तहसीलदार पनवेल विजय तळेकर पनवेल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आदिवासी समाजा साठी राबविण्यात आलेल्या सप्तसूत्री कार्यक्रमा अंतर्गत पनवेल तालुक्यातील वाकडी कातकरी वाडी, हरीग्राम कातकरी वाडी, लहूची कातकरी वाडी, आखाडा कातकरी वाडी, कोरळ वाडी, बानू बाईची वाडी अश्या अनेक वाड्यावर जातीचे दाखल्यांचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर, रत्नाकर घरत, शेखर कानडे आणि रायगड भूषण दत्ता गोंधळी यांच्या हस्ते सदर दाखल्यांचे वितरण करण्यात आल्याची माहिती उरण सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र मढवी यांनी दिली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *