लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा च्या विद्यार्थ्यांनी 14 वर्षामधील गटातून तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये 14 वर्षांमधील गटातून प्रथम स्थान पटकविले. पुढे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धे करता निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या या कामगिरी व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष धोटे, सचिव तथा माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, संचालक अभिजीत धोटे, मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, क्रीडा शिक्षक पुंडलिक वाघमारे, सुभाष पिंपळकर, विष्णू गेडाम या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.