गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग आवश्यक – प्रा.आशिष देरकर* *लखमापूर येथे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार*

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर –
वाल्मिकी मत्स्यपालन सहकारी संस्था मर्या. लखमापूर व भोई समाज लखमापूरच्या वतीने गावातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांच्या सत्काराचा कार्यक्रम नुकताच लखमापूर येथे पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाल्मिकी मत्स्यपालन संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसुरकर होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव थिपे, जिल्हा स्मार्ट ग्राम बिबीचे माजी उपसरपंच प्रा. आशिष देरकर, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश लोखंडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष पुरूषोत्तम पिंपळशेंडे, नवनिर्वाचित सरपंच अरुण जुमनाके, सदस्य शुभम थिपे, आशाताई काकडे, प्रमोद सिडाम, नितीन जुनघरे, दानशूर महिला गिरजाबाई मडावी, देविदास भोयर, वसंता कोंडेकर, कवडू जुनघरे, वाघुजी भोयर, सत्यपाल पिंपळशेंडे, यादव वाघाडे, प्रविण बोम्मावार यांची उपस्थित होती.
ग्रामविकासासाठी शासन अनेक योजना राबवितात. परंतु त्या योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचविणे हे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. गावाचा सर्वांगीण विकास करायचा असेल लोकसहभाग आवश्यक आहे. ग्रामपंचायतीने केवळ ग्रामनिधीवर अवलंबून न राहता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत पाठपुरावा करून जास्तीत-जास्त निधी वेगवेगळ्या बाह्य स्त्रोतांमधून खेचून आणण्याची आवश्यकता असल्याने प्रतिपादन प्रा. आशिष देरकर यांनी केले.
विठ्ठलराव थिपे यांनी भोई समाजाला त्यांचे हक्काचे सभागृह आवश्यक आहे. त्यासाठी आमदार सुभाष धोटे यांचेकडे मागणी करून ते मंजूर करुन घेण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुधीर थिपे, संचालन रोशन भोयर तर आभार संदिप बावने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभम उरकुंडे, राहुल जुनघरे, अक्षय पोतराजे, रोशन कोंडेकर, कवडू भोयर, सुरेश भोयर, रोशन उरकुंडे, समाधान वासाडे, मारोती पंधरे अमित केसुरकर, मोरेश्वर गेडाम, विनोद भोयर, सुबोध उरकुंडे, प्रमोद मेश्राम, भास्कर मेश्राम, बंडू भोयर, अक्षय येटे, सचिन आत्राम यांच्यासह गावकऱ्यांनी सहकार्य केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *