मोरा हायस्कूलला तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार समारंभ संपन्न.

 

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 21 नोव्हेंबर
जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था न्यू इंग्लिश स्कूल मोरा उरण येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतील विजेते विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.अध्यक्षस्थानी शाळा समिती चेअरमन परशुराम मोतीराम कोळी व चंद्रकांत कोळी, शाळा समिती सदस्य आर.के. पाटीलसर, राजश्री कोळी, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर, साईनाथ गावंड, संध्या ठाकूर, मंगला शिंदे, रोहिणी घरत, सुप्रिया मुंबईकर, सुनीता पाटील, राणी कदम, सुगेंद्र म्हात्रे, रूपाली चौधरी, रेश्मा कोल्हे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन ए. के. पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन मनोज म्हात्रे यांनी केले. मान्यवरांच्या शुभहस्ते मार्गदर्शक शिक्षक ए. के. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तालुका विज्ञान प्रदर्शन 2021 मधील शिक्षक शैक्षणिक साहित्य निर्मिती यासाठी तृतीय क्रमांक मंगला शिंदे व मनोज म्हात्रे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला.

 

17 वर्षा खालील जिल्हास्तरावर निवड झालेले विद्यार्थी:-

कुमारी तनवी पारकर : गोळा फेक प्रथम व थालीफेक द्वितीय

कुमारी कविता चव्हाण : 1500 मीटर धावणे प्रथम व 3000 मीटर धावणे द्वितीय

कुमारी वैष्णवी देवरुखकर : 100 मीटर धावणे द्वितीय व 200 मीटर धावणे तृतीय

खो खो मुली गट : तृतीय क्रमांक

शिवकुमार वाल्मिकी : 3000 मीटर धावणे तृतीय

14 वर्षाखालील जिल्हास्तरावर निवड झालेले विद्यार्थी

गौरेश धुले : 100 मीटर धावणे प्रथम क्रमांक

खो खो मुले गट : प्रथम क्रमांक

कबड्डी मुली गट : द्वितीय क्रमांक

कुमारी कस्तुरी गवस : थालीफेक तृतीय व 600 मीटर धावणे तृतीय

कुमारी दीक्षा साबळे : लांब उडी तृतीय क्रमांक

शेवटी उपस्थितांचे आभार सुरेंद्र म्हात्रे यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here