द्रोणागिरी नोड फेरीवाला वेलफेयर असोसिएशन नामफलकाचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते उदघाटन.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 21(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड हा परिसर मोठ्या झपाट्याने विकसित होत असून या परिसरात अनेक लहान मोठे उद्योग धंदे, दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. हातावर पोट भरणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. अशा होतकरू, गरीब गरजू बेरोजगार व्यक्तींना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीकोणातून, त्यांचे हक्क व अधिकार त्यांना मिळवून देण्याच्या उद्देशाने द्रोणागिरी नोड मधील देवकृपा बिल्डिंग सेक्टर 51 येथे द्रोणागिरी नोड फेरीवाला वेलफेअर असोसिएशन नामफलकाचे अनावरण शिवसेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी द्रोणागिरी शिवसेना शहर शाखेच्या कार्याचे कौतुक करत फेरीवाला संघटनेच्या माध्यमातून गोर गरिबांना, बेरोजगारांना न्याय द्यावा. त्यांचे प्रश्न सोडवा असे आवाहन मनोहरशेठ भोईर यांनी नामफलक अनावरण प्रसंगी केले. या नामफलक अनावरण प्रसंगी शिवसेना द्रोणागिरी शहर शाखेचे जगजीवन भोईर शहरप्रमुख,कल्पेश पाटील संपर्कप्रमुख,किसन म्हात्रे संघटक,करण पाटील युवा द्रोणागिरी शहर अध्यक्ष,प्रतिक पाटील उपशहरप्रमुख,सोमनाथ भोईर अध्यक्ष फेरीवाला संघटना,धनंजय शिंदे सचिव,रविंद्र पाटील व्यापारी,द्रोणागिरी नोड फेरीवाला वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ भोईर, उपाध्यक्ष रेश्मा काटे, सेक्रेटरी संदीप सावंत, खजिनदार जितेंद्र पाटील, बापू गरुड, विधित पाटील आदी शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते,फेरीवाला संघटनेचे पदाधिकारी,व्यापारी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here