आटपाडी कायदेविषयी शिबिर

 

लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात

तालुका विधी सेवा समिती आटपाडी पंचायत समिती आटपाडी वकील संघटना आटपाडी व आटपाडी पोलीस स्टेशन यांचे संयुक्त विद्यमाने माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांचे मार्गदर्शन खाली दिनांक 1 नोव्हेंबर 2022 ते 13 नोव्हेंबर 2022 अखेर पॅन इंडिया अवेअरनेस अंतर्गत कायदेविषयक शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये आटपाडी तालुका विधी सेवा समिती यांचे मार्फत दिनांक 1 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर 2022 अखेर आटपाडी तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन तसेच विद्यालय हायस्कूल येथे जाऊन लोकांमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन देऊन कायद्याची जनजागृती करण्याचे महत्त्वाचे काम आटपाडी दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे सन्माननीय न्यायाधीश माननीय श्री विनायक पाटील व अनंत टेंगसे यांनी केले यावेळेस वकील संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री विलासराव देशमुख सचिव विजय सावंत तसेच आजी-माजी सचिव अध्यक्ष सर्व वकील संघटनेतील सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले खरंतर पंचायत समिती आटपाडी व पोलीस स्टेशन आटपाडी यांनी केलेल्या सहकार्यामुळे लोकांपर्यंत पोहोचून कायदेविषयक मार्गदर्शन करणे सोपे झाले यामध्ये लोकांना कायदा म्हणजे काय कायद्याची जुजबी माहिती असणे तसेच तालुका विधी सेवा समिती लोकांना मोफत सहाय्यक कसे करते याबाबत महत्त्व पटवून दिले व समाजातील तळागाळातील पिछड्या वर्गातील लोकांना महिलांना दिव्यांग व्यक्तींना बालकांना मुलींना तसेच इतर घटकांना जर काही त्रास होत असेल त्यांना मोफत विधी सेवा हवी असेल तर त्यांनी न्यायालयाशी अथवा पंचायत समिती आटपाडी येथे संपर्क साधण्याचे ही आवाहन दोन्ही न्यायाधीश साहेबांनी केले आज दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोजी सदर पॅन इंडिया अवेअरनेस कार्यक्रमाची सांगता असताना आटपाडी बस स्थानक आटपाडी येथून ते न्यायालयाच्या आवारापर्यंत पदयात्रा आयोजित करण्यात आली होती सदर पदयात्रा मध्ये गर्ल्स हायस्कूल भवानी हायस्कूल व राजारामबापू हायस्कूलचे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी संबंधित हायस्कूलचे प्राचार्य शिक्षक वर्ग कर्मचारी विद्यार्थी तसेच न्यायालयातील न्यायाधीश वकील संघटनेचे पदाधिकारी सदस्य वकील पंचायत समिती व आटपाडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित राहून सदरची पद यात्रा कायदेविषयक मार्गदर्शन देत घोषणा देत यशस्वीरित्या संपन्न केली सदर कार्यक्रमाची सांगता होत असताना माननीय श्री विनायक पाटील यांनी वकील संघटना पंचायत समिती न्यायालयीन कर्मचारी आटपाडी पोलीस स्टेशन उपस्थित सर्व लोकांचे आभार मानले व त्यांनी केलेल्या सहकार्याद्वारेच सदरचे कार्यक्रम वेगवेगळ्या गावांमध्ये यशस्वीरित्या संपन्न झाले याबाबत त्यांनी आभार मानले त्यांनी पुढेही जाऊन असे सांगितले की आपणास जर कोणत्याही घटकावर अन्याय होताना दिसत असेल तर आपण त्याबाबत तात्काळ संपर्क करून तालुका विधी सेवा समिती आटपाडी अथवा पंचायत समिती आटपाडी व अगदीच शक्य झाले तर पोलीस स्टेशन आटपाडी येथे संपर्क करून आपला अर्ज करावा व मोफत विधी साह्य मिळवावे याच वेळेस त्यांनी आवर्जून काल दिनांक 12 11 2022 रोजी झालेल्या लोक आदालतीचा सुद्धा उल्लेख केला यामध्ये न्यायालयातील तडजोडीने 73 प्रकरणे मिटली तर दावा पूर्वप्रकरणी सुद्धा मिटलेने न्यायालयाला जवळपास 82 लाख रुपयांची वसुली होऊन लोक अदालत यशस्वी त्या संपन्न झाली बाबतची माहिती सुद्धा दिली तसेच भविष्यामध्ये होणाऱ्या तालुका विधी सेवा समितीमार्फत कायदेविषयक शिबिरांचे मार्गदर्शन लोकांनी अवश्य घ्यावे व त्याची अंमलबजावणी करावी याबाबत त्यांनी आवाहन केले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *