*राष्ट्रीय साहसिक शिबिरात विदर्भ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा समावेश*

लोकदर्शन 👉 प्रा. गजानन राऊत

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय द्वारे राष्ट्रीय साहसिक शिबिराचे दिनांक 15 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर हिमाचल प्रदेश येथील मनाली येथे अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनरिंग अँड स्पोर्ट्स येथे होणार असून या शिबिरात देशभरातील विविध विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. या शिबिरात महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील संलग्नीत महाविद्यालयाचे २० स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. या शिबिरासाठी गोंडवाना विद्यपीठ गडचिरोली अंतर्गत एकमेव जिवती सारख्या अतिदुर्गम भागातील विदर्भ महाविद्यालय जिवती येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा अत्यंत सक्रिय स्वयंसेवक साईराम जाधव याची निवड झालेली, असून तो मनाली येथे होणाऱ्या राष्ट्रीय सहासिक शिबिरासाठी रवाना झालेला आहे. त्याच्या या यशस्वी व अभिमानास्पद वाटचालीसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.एस.एच. शाक्य यांच्या मोलाचे मार्गदर्शन व भरीव योगदनाने व रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी संजयकुमार देशमुख यांच्या अथक परिश्रमाने सदर विद्यार्थ्यास राष्ट्रीय शिबिरात सहभागी होण्याचा अविस्मरणीय क्षण वाट्याला आला. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विभागीय समन्वयक डॉ. गेडाम मॅडम यांच्या सहकार्यामुळे हे शक्य होऊ शकले सदर विद्यार्थ्याच्या या प्रवासाकरिता व कार्याकरिता प्रा. राऊत सर, तेलंग सर, लांडगे सर, पानघाटे सर , साबळे सर आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here