उरण तालुक्यात भाजपला मोठे खिंडार पक्षप्रमुख मा श्रीउद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपा चे जिल्हा सरचिटणीस दीपक भोईर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

लोकदर्शन उरण(नविमुबई) 👉विठ्ठल ममताबादे

 

उरण दि ५ नोव्हेंबर २०२२
शनिवार दिनाकं 05 नोव्हेंबर 2022 रोजी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत व सचिव खासदार अनिल देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत उरण विधानसभा मतदारसंघात उरण तालुक्यातील भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दीपक भोईर यांनी भारतीय जनता पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना भवन येथे झालेल्या या पक्ष प्रवेश कार्यक्रमात रजनीकांत तांडेल, सचिन भोईर, निखिल भोईर, भारत ठाकूर, राकेश नारायण भोईर तसेच गोवठणे बीजेपी मधून किरण नथुराम म्हात्रे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यांनी शिवसेना(श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षात प्रवेश केला.दिवसेंदिवस उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) पक्षात पक्ष प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढतच असून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

 

यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर,उपतालुका संघटक अमित भगत, चिरनेर ग्रामपंचायत सदस्य धनेश ठाकूर, धुतुम ग्रामपंचायत सदस्य रविनाथ ठाकूर, विभागप्रमुख एस के पुरो,उपविभागप्रमुख राजन कडू, कामगार नेते गणेश घरत, मधुकर कोळी, दिनेश घरत, पंकज सुतार, युवासेनेचे भार्गव सामंत, निशांत घरत,ओम पाटील, ग्राहक संरक्षण कक्षाचे अजय सुतार, संदिप जाधव, शाखाप्रमुख शैलेश भोईर, कमलाकर तांबोळी, गणेश तांबोळी, कमलाकर ठोकळ, उरण तालुक्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here