भाजप नेते माजी जि. प. सदस्य भीमराव पा. पूसाम यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.

 

लोकदर्शन👉 मोहन भारती

मंगी (बु) येथे आमदार सुभाष धोटेंच्या उपस्थितीत कार्यकर्ता बैठक.

राजुरा :–राजुरा तालुक्यातील मौजा मंगी (बु) येथे आज कार्यकर्ता बैठक संपन्न झाली. या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील पुसाम यांनी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मंगी (बू) येथील बालचंद्र बुजाडे यांच्या घरी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी चंदू बूजाडे, रामचंद्र बुटले, धनराज साळवे, संजय मेश्राम, सुमित आसुटकर, रवींद्र गोहने, दशरथ पुलगमकर, सिद्धार्थ चनकापुरे, जयपाल इंदोर, अविनाश सातपुते, जगु कुमरे, विजय मडावी, अजय आत्राम, अजय उईके, विजय गुगुल, नवनाथ जाधव, सुनील भोयर, रामदास पा बोरकुटे, प्रभाकर मडावी, शरद पुसम, रमेश भिवनकर यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. सर्वांना काँग्रेसचे दुप्पटे देवून आमदार धोटे यांनी काँग्रेस पक्षात स्वागत केले.
या प्रसंगी काँग्रेसचे विधानसभा समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, विजय क्रांती कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय ठाकरे, माजी प स सदस्य रामदास पूसाम, आत्मा समितीचे अध्यक्ष संतोष इंदुरवार, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इर्शाद शेख, बबन आत्राम, सुनील भोयर, सरपंच शंकर तोडासे, महादेव भसारकर, उपसरपंच संदीप घोटेकर, शुभाकांत शेरखी यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *