चार्ली ग्रामपंचायतवर काँग्रेसचा झेंडा. ⭕सरपंचपदी काँग्रेसचे विजय निवलकर यांची अविरोध निवड.

लोकदर्शन 👉 प्रा.अशोक. डोईफोडे

राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा चार्ली ग्रामपंचायतीवर काँग्रेसने आपला झेंडा फडकविला असून येथे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी आज पार पडलेल्या निवडणूकीत काँग्रेसचे विजय उद्धव निवलकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजुरा पं. स. चे विस्तार अधिकारी रवींद्र रत्नपारखी, सचिव विवेक वाडके यांनी काम पाहिले.
नवनिर्वाचित सरपंच विजय निवडकर यांच्या निवडीबद्दल लोकप्रिय आमदार सुभाष धोटे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, निर्मला कुळमेथे, कृ. उ. बा. समितीचे संचालक उमाकांत धांडे, माजी सरपंच सुरेंद्र आवारी,माजी उपसरपंच किशोर ढुमणे, प्रदीप दुबे, ग्रा. प. सदस्य कल्पना माहुरे, वंदना आत्राम, सरिता ढुमणे, प्रमोद धांडे, बाळकृष्ण ढुमणे, संभा माहुरे, पांडुरंग दरेकर, गंगाधर कुचनकर, अशोक नक्षीने, श्यामसुंदर थिपे, दादाजी निकोडे, बबन ढुमणे, यासह काँग्रेसच्या विविध आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समस्त चार्लीवाशीय नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *