जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्या. आढावा बैठकीत आमदार सुभाष धोटेंच्या अधिकाऱ्यांना सूचना.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :- राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, गोंडपिपरी, कोरपना आणि जिवती तालुक्याच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक विश्रामगृह राजुरा येथे आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना आमदार सुभाष धोटे यांनी क्षेत्रातील गोरगरीब, जनसामान्य नागरिकांच्या समस्या माणूसकीच्या नात्याने जाणून घेवून त्या सोडविण्यासाठी युध्द स्तरावर पाठपुरावा करून सर्व गरजु लाभार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा तसेच कोणताही लाभार्थी वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी अशा सुचना दिल्या.
या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना सांगितले की सर्वांनी आपापल्या विभागातील गरजू लाभार्थींना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करून गोरगरीब जनतेच्या न्यायासाठी विशेष परिश्रम घ्यावे. विभागा अंतर्गत प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करावा. अतिवृष्टी व पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देणे, नवीन शासन निर्णयानुसार कुणाची नावे सुटली असेल तर फेरचौकशी करणे, घरकुल लाभार्थींची प्रकरणे निकाली काढणे, रेशन कार्ड धारकांना अन्नधान्य उपलब्ध करून देणे, जमीनीचे पट्टे वाटप करणे, रोजगार हमी योजनेची कामे, मनरेगा ची कामे, रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करणे, रस्त्याच्या कडेला साईड पट्टी तयार करणे, पांदन रस्त्यांची कामे पूर्ण करणे, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीची कामे पूर्ण करणे, क्षेत्रातील आरोग्य व्यवस्था मजबूत करणे, आवश्यक मनुष्यबळ व अन्य सुविधांसाठी पाठपुरावा करणे, शेतमाल खरेदी करण्यासाठी यंत्रणा सक्षम करणे, शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणे, शिक्षण विभागाच्या समस्या सोडविणे, सहाय्यक शिक्षकांची रिक्त पदे भरणे, शिक्षक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे, सिंचन सुविधा सक्षम करणे, बंधाऱ्यांची देखभाल दुरुस्ती करणे, तलाव व अन्य सिंचन योजनेचे कामे पूर्ण करणे, पाणी पुरवठा विभागाने शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे यासह नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी झटावे असे आवाहन केले. तर नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा तातडीने करण्याचे निर्देश दिले.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, जेष्ठ नेते सुरेश पा मालेकर, तहसीलदार हरिष गाडे, के. डी. मेश्राम, महेंद्र वाकलेकर, प्रवीण चिडे, गटविकास अधिकारी नागेश ताजने, गजानन मुंडकर, विजय पेंदाम, भागवत रेजिवाड, उपविभागीय अभियंता विनोद खापणे, संजय गडकरी, एम. पी. पवार, अन्नपुरवठा विभागाचे निरीक्षक सविता गंभीरे, तालुका वैद्यकिय डॉ. प्रमोद नगराळे, पी. एस. व्हेलेकर, आनंद नेवारे, आर. एच. रत्नपारखी, डी. बी. बैलमवार, अमित मेश्राम, मनोज गौरकर, अभिनंदन काळे, एस. मेश्राम यासह चारही तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *