



लोकदर्शन. पुणे 👉 स्नेहा उत्तम मडावी
आज आहे दिवाळी!
श्रीमंतांची लकझक!
तर गरीबांची काटकसरी!
कुठे दिव्यांच्या माळा!
तर कुठे फक्त एक ज्योती!
कुठे फटाक्यांचा कल्ला!
तर कुठे गरीबांच्या आशा!
कुठे चमचमीत गोडधोड!
तर कुठे तुकड्यांची अपेक्षा!
नको लक्ष्मी माता सोनं नाणं!
फक्त दे गरीबास एकवेळच खाणं!
नको राहायला आज कुणीही उपाशी!
प्रकाश कर प्रत्येकाच्या दाराशी!
दीपावली म्हणजे सणांची सम्राज्ञी. हा सण आपल्याला दुःखातून आनंदाकडे, नैराश्यातून उत्साहाकडे आणि अंध:कारातून प्रकाशाकडे नेणारा असतो. दीप म्हणजे दिवा….”दीप्यते दीपयति वा स्वं परं येति” अर्थात जो स्वतः प्रकाशतो किंवा दुसऱ्याला प्रकाशित करतो तो दीप” सर्व सामांन्याच्या जीवनात येते कधीतरी दिवाळी, भौतिक सुखापासुन, दुर जगापासून किती तरी पावले दुर असे जंगलात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबाच्या आयुष्यात कोठून येणार दिवाळी? संदीप राक्षे यांनी गेल्या अकरा वर्षांपासून एक निर्धार केला आहे की, अतिशय दुर्गम भागात जावुन वंचित परिवाराला व त्यांच्या मुलांना दिवाळी फराळ व नवीन कपड्यांचे वाटप करायचे, यापूर्वी त्यांनी तोरणमाळ, नंदुरबार, चिखलदरा, अमरावती येथील जंगलात राहणा-या आदिवासी भागात जावून हा उपक्रम राबविला आहे. यावर्षी नगर जिल्ह्य़ातील अकोले तालुक्यातील रतनवाडी भागात जाऊन तेथील सरपंच संपतराव झडे यांना सोबत घेऊन आदिवासी पाड्यावर जाऊन कपडे व दिवाळी फराळाचे वाटप केले त्यावेळी सिनेमॅटोग्राफर मारूती तायनाथ हे सोबत होते..
आदिवासींचे जीवन म्हणजे जीवनात कायम अंधारच, ना शिक्षण ना जगाची माहिती आपल्याच मिळालेल्या जीवनात आनंद शोधणारी जमात, जंगलात फिरून जी काही जडीबुटी मिळते त्यावर. किंवा मिळेल त्या जागेत नाचणीचे पीक घेऊन आपला उदरनिर्वाह करीत ना आशा ना आकांक्षा, अंग झाकायला मिळेल इतका एखादा कपडा तो पण धुवून पुन्हा घालायचा, अशा जीवन व्यथित करणाऱ्या आदिवासी पाड्यात जावुन दिवाळी फराळाचे व कपड्यांचे वाटप करताना त्या मुलांच्या चेहर्यावरील आनंद पाहुन माझी दिवाळी साजरी झाल्याचा अत्यानंद मला झाला असे संदीप राक्षे आवर्जून सांगतात…