कॉम्रेड बळवंतराव शिरतोडे श्रमप्रतिष्ठा पुरस्कार व कॉम्रेड गिताबाई शिरतोडे कर्तुत्ववान महिला सन्मान पुरस्काराचा आठ नोव्हेंबरला वाझर येथे प्रदान सोहळा* *♦️महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदार मंगळवारी वाझर मध्ये* *♦️सरपंच संजय जाधव,उपसरपंच हणमंतराव जाधव यांची माहिती*

लोकदर्शन 👉 राहुल खरात

खानापूर तालुक्यातील वाझर सारख्या छोट्याशा खेड्यात प्रबोधनातून समाज परिवर्तनाची चळवळ गेली अनेक वर्षे सातत्याने राबवणारे कुटुंब म्हणून कॉम्रेड मारुती शिरतोडे यांच्या कुटुंबाकडे पाहिले जाते. गरीब कुटुंबातील बळवंतराव व गिताबाई या दांपत्याने अतिशय हलाखीतून कष्टातून आपल्या मुलाला शिकवले व पुरोगामी चळवळीत काम करण्याची प्रेरणा दिली स्वातंत्र्यलढ्यात काम केलेले परंतु उपेक्षित राहिलेल्या या कुटुंबाने सामाजिक बांधिलकी म्हणून आपण राहतो त्या खेड्यात कायम समाजप्रबोधनाची मशाल तेवत ठेवली आणि समाज परिवर्तनाच्या लढ्याला बळ दिले. या दाम्पत्याच्या पश्चात मुलगा कॉम्रेड मारुती शिरतोडे यांच्या पुढाकाराने व पलूस कडेगाव खानापूर तासगाव तालुका परिवर्तनवादी चळवळ,समाजवादी प्रबोधिनीच्या सहयोगाने कॉम्रेड बळवंतराव शिरतोडे श्रमप्रतिष्ठा पुरस्कार व कॉम्रेड गिताबाई शिरतोडे कर्तुत्वान महिला सन्मान पुरस्कार हा महाराष्ट्रातील राबणाऱ्या बहुजन समाजातील कष्टकरी कामगार दलित स्त्रिया पर्यावरण अशांच्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला दरवर्षी देऊन सन्मानित केले जाते व समाजप्रबोधन पर परिसंवाद ठेवला जातो. यंदाचे श्रमप्रतिष्ठा पुरस्काराचे अकरावे वर्ष तर महिला सन्मान पुरस्काराचे चौथे वर्ष आहे. मंगळवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता वाझर येथे या पुरस्काराचा दिमाखदार सोहळा दोन आमदार व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदार म्हणून ज्यांची नोंद घेतली जाते ते डहाणू विधानसभेचे लोकप्रिय आमदार विनोद निकोले मंगळवारी वाझर मध्ये येणार असल्याने जिल्ह्याच्या डाव्या, पुरोगामी चळवळीत उत्साहाचे वातावरण आहे.तसेच पर्यावरण क्षेत्रात गेली 25 वर्षाहून अधिक काळ नर्मदा बचाव आंदोलन,वांग मराठवाडी धरणग्रस्तांचा लढा,लवासा विरोधी लढा यातून जनसंघर्ष करणाऱ्या पर्यावरणवादी नेत्या सुनीती सुर या यांच्या स्वागतासाठी पर्यावरण क्षेत्रातील काम करणारे अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण अण्णा लाड यांच्या हस्ते दोन्ही पुरस्कार प्रदान केले जाणार असून ज्येष्ठ विचारवंत डॉ.प्रा. बाबुराव गुरव,भाई व्ही.वाय.पाटील, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे नेते कॉम्रेड धनाजी गुरव,पाणी चळवळीचे संघटक भाई संपतराव पवार, महामार्ग संघर्ष समितीचे डॉ.अमोल पवार तसेच इतर पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रदान सोहळा उत्साहात संपन्न होणार आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ,रोख रक्कम व पुस्तके असे या पुरस्काराचे स्वरूप राहणार आहे. अशी माहिती स्वागताध्यक्ष सरपंच संजय जाधव,उपसरपंच हणमंतराव जाधव व पुरस्कार निवड समितीचे सचिव कॉम्रेड मारुती शिरतोडे यांनी दिली. यावेळी हिम्मतराव मलमे, विक्रम शिरतोडे, विशाल शिरतोडे, वैभव शिरतोडे ,बाळासाहेब खेडकर,महेश मदने आदी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *