श्री. संत शिरोमणी गोरोबा काका यांना पुण्यतिीनिमित्त अभिवादन ♦️सर्व युवा बांधवांनी संत गोरोबा काकांचे विचार अंगिकारावे – देवराव भोंगळे

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

घुग्घुस येथील गांधी चौक, कुंभार मोहल्ला येथे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. संत शिरोमणी गोरोबा काका मंदिरात श्री. संत शिरोमणी गोरोबा काका युवा कमेटी व सर्व कुंभार समाज बांधवांतर्फे मंगळवार, १८ एप्रिल रोजी श्री. संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी श्री. संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या मूर्तीला माल्यार्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे विशेष उपस्थित होते.
सकाळी घटस्थापना व भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. बुधवार, १९ एप्रिल रोजी सायंकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला.

भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, राजेश मोरपाका, सतीश बोन्डे, कुंभार समाजाचे लुकेश ठाकरे, योगेश ठाकरे, महादेव खोबरे, मनोज खोबरे, प्रवीण ठाकरे, शुभम वाणी, रवींद्र ठाकरे, प्रफुल वाणी, गणेश ठाकरे, प्रफुल कपाटे, सुनील ठाकरे, मनोज बोरसरे, तुषार पाडेवार, सोमेश्वर बोरसरे, राकेश ठाकरे, पंकज ठाकरे, निशांत ठाकरे, पवन ठाकरे, प्रवीण खोबरे, देवानंद वझे, विशाल ठाकरे निलेश बोरसरे, मंगेश खोबरे, क्रिष्णा बुरबांदे, गणेश खोबरे, आकाश ठाकरे, दिनेश खोबरे, विशाल पातर व मोठया संख्येत समाज बांधव उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *