जासई विदयालयात पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 135 वा जयंती सोहळा उत्साहात साजरा

लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि 2 ऑक्टोंबर रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक ,शिक्षणमहर्षी ,पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 135 व्या जयंती निमित्त श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज जासई येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते .सर्वप्रथम शालेय परिसरातील महापुरुषांच्या तसेच लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी अण्णांच्या जीवनावरती काढलेल्या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोर्ट विभाग नवी मुंबईचे सहायक पोलिस आयुक्त धनाजी शिरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर कर्मवीर अण्णा व रयत माऊली तसेच लोकनेते दि. बा. पाटील साहेबांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या उपस्थितीत सभेस प्रारंभ झाला.यानंतर विद्यार्थीनींनी कर्मवीर गीत व स्वागत गीत म्हटले . याप्रसंगी व्यासपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र साळुंखे (सहसचिव माध्यमिक रयत शिक्षण संस्था सातारा) ,प्रमुख पाहुणे धनाजी क्षीरसागर (सहायक पोलीस आयुक्त ,पोर्ट विभाग ,नवी मुंबई ), प्रमुख वक्ते चंद्रकांत जाधव(लाईफ मेंबर ,विभागिय अधिकारी ,र.शि.सं.सातारा )उपस्थित होते . या कार्यक्रमास सहा. विभागीय अधिकारी शहाजी फडतरे , विद्यालयाचे चेअरमन अरुणशेठ जगे शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष व कामगार नेते सुरेश पाटील ,सभापती नरेश घरत ,ग्रामपंचायत जासई सरपंच संतोष घरत ,विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे सर्व सदस्य, इतर शिक्षण प्रेमी नागरिक तसेच पालक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. व्यासपीठावरील पाहुण्यांचे स्वागत व सत्कार विद्यालयाच्या प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचे नियोजन रयत सेवक संघाचे समन्वयक व जेष्ठ शिक्षक नुरा शेख यांनी केले.त्यानंतर कॉलेजचे प्राध्यापक पाटील.ए.आर यांनी प्रमुख पाहुण्यांची विशेष परिचय करून दिला . कार्यक्रमाचे प्रास्ताविकात विद्यालयाचे मुख्याध्यापक ,रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग सर यांनी विद्यालयाच्या यशाचा चढता आलेख स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या विकासाबाबत व विद्यालयाच्या भौतिक सुविधांबाबत झालेल्या कामाचा तपशील दिला .यानंतर विद्यालयातील मागील वर्षी इयत्ता दहावी ,बारावी मध्ये प्रथम ,द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष,कामगार नेते तसेच भारतीय मजदुर संघाचे महामंत्री सुरेश पाटील यांची दिल्ली येथे शासकीय पोर्ट केंद्रीय वेतन करारावर निवड झाल्याबद्दल त्यांना विद्यालयाकडून सन्मानित करण्यात आले.डी.आर. ठाकूर यांना रायगड भूषण पुरस्कार मिळाल्याबददल त्यांचा विद्यालयाकडून सन्मानित करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य ,रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग यांना राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य आचार्य शिरोमणी पुरस्कार तसेच आंतरराज्य प्राचार्य गौरव पुरस्कार मिळाल्याबददल विद्यालयाकडून सन्मानित करण्यात आले. पायगोंडा देवगोंडा पाटील पुरस्काराने सन्मानित विद्यालयाच्या आदर्श विज्ञान शिक्षिका पाटील एस.सी.यांचा विद्यालयाकरून सत्कार करण्यात आला.विद्यालयातील दहावी ब मधील विद्यार्थिनी तृप्ती मनोहर चाटे हिने अण्णांच्या कार्याची माहिती सांगितली .प्रमुख पाहुणे ,प्रमुख वक्ते तसेच अध्यक्ष यांनी आपापले मनोगतातून विद्यार्थ्यांना कर्मवीरांचे तसेच शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रयत सेवक संघाचे समन्वयक व ज्येष्ठ शिक्षक नूरा शेख यांनी करून कार्यक्रम यशस्वी करण्यात मदत केली . आभाप्रदर्शन गुरुकुल विभागप्रमुख म्हात्रे जी.आर यांनी केले. कार्यक्रम संपन्न करण्यात विद्यालयातील
सर्व शिक्षक ,प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले. शेवटी वन्दे मातरम् घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *