माहेरवाशिण संस्थेकडुन चेतना असोशिएशन फाॅर दी फिजिकली हॅन्डीकॅप मधील सदस्यांना माहेरपणाचा सुखद अनुभव

लोकदर्शन बदलापूर 👉-गुरुनाथ तिरपणकर)-

ज्यांना माहेर नाही,कोणाच्या डोक्यावर आईचे छत्र नाही,माहेरपण काय हे माहीत नाही अशा परिस्थितीत माहेरपण अनुभवण्यासाठी,आपल्या अंगातली कलागुणांना,भावना व्यक्त करण्यासाठी व आनंद घेण्यासाठी बदलापूरातील जेष्ठ श्रेष्ठ महिला पुरूष प्रभाताई शिर्के यांच्या”माहेरवाशिण”या संस्थेत येऊन आपले माहेरपण अनुभवत असतात.अशा प्रसंगी काही दिवसापूर्वी चेतना असोशिएशन फाॅर दी फिजिकली हॅन्डीकॅप मधील महिला-पुरुष सदस्यांचे प्रभाताईंच्या माहेरघरात आगमन झाले.प्रभाताई शिर्के यांनी त्यांचे स्वागत त्यांच्यावरुन भाकरी तुकडा ओवाळून त्यांची नजर उतरवुन,चरणस्पर्श करुन धुवुन,कुंकुमतिलकाने पुष्पवृष्टी करुन संगितमय वातावरणात भावपुर्ण स्वागत केल.त्यांच्या या स्वागताने सर्वच भारावून गेले व नकळत डोळ्यातून पाणी तरळले.पूणे,सातारा,बदलापूर,विरार,मिरारोड अशा शहराच्या विविध भागातून या अंध व्यक्ती आल्या होत्या.प्रत्येकाच्या अंगात वेगवेगळी कला आहे.दीपा ठाकुर मॅरेज ब्युरो चालवता,आकाशवाणी पूणे केंद्रावर कार्यक्रम सादर केले.महेश मिश्रा हे परफ्युम परिक्षण करतात,पंकज गायकवाड इलेक्ट्रीक ऑफीस मध्ये कार्यरत,अनिल कांबळे हाॅकर आहेत.संभाजी काठे शेतकरी,लक्ष्मण काटे हे ट्रस्ट हाॅस्पिटल मध्ये मेचोपेथी,संजय उपाध्याय फ्रिलान्स प्रोग्राम्स करतात,शलाका जगताप कवी,नाट्यकलाकार आहेत.ललिता वाडीया या एमटीएनएलच्या सेवा निवृत कर्मचारी आहेत.छाया मिश्रा ब्लाटींग ब्लाइंन्ड साठी कुकींग आहेत.सुवर्णा उपाध्याय हाऊस वाईफ,सुदाम शिंदे बाॅडी मजासीज व नकलाकार आहे.संध्या चाफेकर या नर्स व आदिवासी पाड्यात काम करतात सोशल वर्कर आहेत.संगिता गोखले राजावाडी,घाटकोपर येथे टीचर आहेत.हेमंत पेंडसे कलाकार व सिंगर आहेत.डोळस व्यक्तींपेक्षाही या अंध महिला-पुरूषांमध्ये विविध प्रकारचे कलागुण ठासुन भरलेले आहेत.आणि अंधत्वाचा कुठलाही बागुलबुवा न करता एका कर्तव्य निष्ठेने निर्धाराने जगापुढे जात आहेत. ही कौतुकास्पद बाब आहे. प्रभाताईंच्या या माहेरघरात सर्वजण मनसोक्त हिंडणे,फिरणे,खेळणे,गाणी म्हणणे,नृत्य करणे असे व्यक्त होत होते,संचार करत होते.प्रभाताई शिर्केंकडुन चहा,त्यांचा आवडता नास्टा,त्यांच्या आवडीचे जेवण मिळाले.प्रभाताईंचा व माहेरवाशिणचा निरोप घेताना सर्वांच्या डोळ्यात पाणी तरळले. असा माहेरवाशिण संस्थेतील चेतना असोशिएशन फाॅर दी फिजिकली हॅन्डीकॅप मधील सदस्यांचा हा सुखद अनुभव अविस्मरणीय असाच होता.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *