Home
Home Breaking News वसंतराव नाईक विद्यालयाचे कनिष्ठ लिपिक श्री. विजय बोरडे यांना भावपूर्ण निरोप व...

वसंतराव नाईक विद्यालयाचे कनिष्ठ लिपिक श्री. विजय बोरडे यांना भावपूर्ण निरोप व सत्कार

 

लोकदर्शन👉 प्रा. अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना.

वसंतराव नाईक विद्यालय कोरपना.येथील कनिष्ठ लिपिक श्री. विजय बोरडे नियत वयोमानानुसार 58 व्या वर्षी प्रदीर्घ सेवेनंतर 30 सप्टेंबर ला सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने शाळेत त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री डि. जी.खडसे होते. प्रमुख अतिथी म्हणून एस. वि.बावणे, गणेश गोडे , के. डी घूगूल ,अनिल काकडे, एस. एम मने. उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री.डि. जी. खडसे यांच्या शुभ हस्ते श्री.विजय बोरडे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री.सातपूते.पाचभाई.गायधने.राजू लांडगे विलास धोटे अशोक खवसे ,तसेच अतिथीनि विजय बोरडे यांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय कार्याची प्रशंसा करून भावी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या. विजय बोरडे यांनी सत्काराला उत्तर देताना शाळेबद्दल तसेच संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली,
कार्यक्रमाचे संचालनलामसोगे यांनी केले तर आभार श्री ढेगळे. यांनी मानले .
या प्रसंगी पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here