हृदयरोग दिना निमित्त डॉ राहुल साठे यांनी केले मार्गदर्शन.

लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि 30 सप्टेंबर मॉर्निंग कट्टा विमला तलाव उरणच्या माध्यमातून विमला तलाव उरण शहर येथे दररोज सकाळी 7.30 वाजता व्यायाम व योगा केला जातो.मॉर्निंग कट्टाच्या माध्यमातून सर्व ज्येष्ठ नागरिक विमला तलाव येथे सर्वजण एकत्र येत असतात. या मॉर्निंग कट्टाच्या माध्यमातून व्यायाम, योग व जीवनाविषयक मार्गदर्शन मिळत असल्याने ज्येष्ठ नागरिकांची संख्या नेहमी मोठ्या प्रमाणात सकाळी विमला तलाव येथे पहावयास मिळते. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मार्गदर्शनपर व्याख्यान तसेच वाढदिवस साजरे केले जातात. महिन्यात ज्याचे ज्याचे वाढदिवस असतात त्या सर्वांचे वाढदिवस एकाच दिवशी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एखादा दिवस ठरवून साजरे केले जातात. दि 30/9/2022 रोजी ज्येष्ठ नागरिक प्रदिप खैरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आला. तर सामाजिक बांधिलकी जपत मॉर्निंग कट्टाच्या माध्यमातून प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ, मधुमेह तज्ञ डॉ. राहुल साठे यांच्या हस्ते गरिब निराधार असलेल्या राणी यांना यावेळी आर्थिक मदत करण्यात आली.हृदयरोग दिनाचे औचित्य साधून उरण तालुक्यातील प्रसिद्ध मधुमेह तज्ञ हृदयरोग तज्ञ डॉ. राहुल साठे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी हार्ट अटॅक येऊ नये, डायबेटीस होऊ नये, डायबेटीस झाल्यावर काय काळजी घ्यावी, हार्ट अटॅक आल्यावर काय करावे, डायटचे महत्व, शरीराची निगा कशी राखावी इत्यादी अनेक गोष्टी बद्दल डॉ राहुल साठे यांनी सुंदर व सोप्या भाषेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.मॉर्निंग कट्टा विमला तलाव उरणचे संस्थापक सुबोध दर्णे व प्रकाश दांडेकर,व्यायाम मार्गदर्शक उल्हास मोकाशी, सभासद-अनंता पाटील, दिलीप महाडिक, सुनील घरत, ऍड मछिंद्र घरत, हरमन फर्नांडिस, अजय शिवकर, बाबुलाल, अशोक म्हात्रे, प्रदीप खैरे, लक्ष्मण सेवक, जनार्धन म्हात्रे, अशोक पालकर,चिटणीस मॅडम, राणी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *