



लोकदर्शन 👉 सौ भारतीय वसंत वाघमारे
राहणार मंचर
तालुका आंबेगाव
जिल्हा पुणे
चतुर्थीच्या दिवशी मुशकावर
स्वारी आली तुमची.
शेंदूर लाल अंगावर उधळून
आनंद पर्वणी आमची .
जास्वंद दूर्वा शोभे
मस्तकी टिळा
रूप तुझे सुंदर
कंठी मोतीयाच्या माळा .
मस्तकी दिसे सुंदर
मुकुट सोन्याचे.
मोदकाचा प्रसाद
भाळी गंध चंदनाचे
दहा दिवसांची संगत
खेळ खेळतो अंगणी.
येथे निरोप देण्याची वेळ ,
हृदय येतेय दाटूनी.
निरोप तुम्हाला देताना
अश्रूंचा बांध फुटतो.
आकाश हळवे होऊन
चंद्र सूर्य गळा भेट घेतो.
जाता जाता विनंती
एक देवा तुम्हाला .
पुढच्या वर्षी लवकर
यावे वाटते आम्हाला
पुढच्या वर्षी तुम्ही
यावे घरी लवकर .
पाना फुलांनी सजवेलं
बप्पा तुमची सुंदर मखर .
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या.
सौ भारतीय वसंत वाघमारे
राहणार मंचर
तालुका आंबेगाव
जिल्हा पुणे