



लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना,,,
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, वैद्यकीय शाखा प्रवेश परीक्षेमध्ये( नीट) कोरपणा येथील त्रिवेणीबाई डोहे विद्यालयाचे मुख्याध्यापक नानाजी ढवस यांचे चिरंजीव वैष्णव यांनी भरघोस यश संपादन केले असून या परीक्षेत त्याला 720 पैकी 622 गुण मिळाले आहे ओबीसी प्रवर्गातून 4628 रँकिंग नी त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केले असून त्याने 12 वी चे शिक्षण राजश्री शाहू महाराज महाविद्यालय ,लातूर येथून पूर्ण केले आहे .त्याला इयत्ता दहावी मध्ये 96 टक्के गुण मिळाले होते तर बारावीत 91 टक्के गुणांनी तो उत्तीर्ण झाला होता .नागपूर विभाग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था चंद्रपूर तर्फे त्याचा दहावीत गुणवंत म्हणून सत्कार करण्यात आला होता आणि नुकतेच त्याने नीट परीक्षेतील भरघोष यशाबद्दल संस्थेचे संचालक संजय ठावरी यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे आई वडील आजी बहीण यांच्या समवेत साहेबराव देवाळकर , शंकरराव साळवे , वसंतराव बोबडे , संजय राजुरकर यांच्या समवेत जाऊन त्याला ग्रामगीता व पुष्पगुच्छ भेट देऊन सन्मानित केले, त्याच्या या यशाने देशातील वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस साठी त्याचा प्रवेश निश्चित झाला आहे. जिद्द आणि कठोर परिश्रम घेण्याची तयारी असली तर यश आपल्या पदरी येते हे त्याने दाखवून दिले ग्रामीण भागातील या तरुणाचं कोरपणा परिसरात सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे..