आनंदगिरीची कुळकथा

घुसखोर कुठे सापडणार नाहीत ..ते सर्वत्र आहेत .केवळ भारताच्या सीमाभागात घुसखोरी होते असा भागच नाही .राजकारणात कलंकित , लुटारू व्यक्तींची , सामाजिक कार्यात असामाजिक तत्वांची , शिक्षणक्षेत्रात राजकारण्यांची अन आध्यत्मिक क्षेत्रात अव्वल बदमाशांची घुसखोरी आजची नाही तर फार पूर्वीपासून आहे ..या अवघ्यांच्या डोळा त्या क्षेत्रात होणाऱ्या कमाईवर असतो ..पत्रकारिता माध्यमे सुद्धा यातून सुटली नाही ..ट्रस्ट च्या नावाने नोंदविलेल्या धार्मिक संस्थांची सर्वांग चौकशी केली तर मोठे घबाड सापडेल ..आता सर्वच तसे नसले तरी बरेच तसे आहेत ,.भारतातील बहुसंख्य धार्मिक स्थळावर प्रचंड गोंधळ आहे ..मंदिर , गिरजाघरे , मशिदी सांभाळणारे ट्रस्ट म्हणजे भक्तांची सेवा करण्यापेक्षा त्यांच्याकडून मेवा किती मिळतो याचीच अधिक काळजी वाहणारी संस्थाने ..,याला अपवाद शेगावच्या गजानन महाराज संस्थान सारखे बोटावर मोजणारी संस्थाने सांगता येतील .देशांतर्गत मंदिरे , मठ ,आखाडे , आदींकडे अब्जावधीची चल ,अचल संपत्ती आहे .. साधू , संन्याशाच्या रुपात अवतरलेल्या काही संधीसाधू भांमट्यांचे लक्ष त्या संपतीवरच केंद्रित असते ..मग ती लुबाडण्या साठी डाव खेळले जातात ..असाच डाव आत्महत्या झालेल्या आखाडा परिषदेच्या महंत नरेंद्र गिरी यांच्या संदर्भात त्यांचा चेला आनंद गिरीने खेळला …आपल्या गुरुलाच ब्लॅक मेलिंग करणाऱ्या या चेल्याला पोलिसांनी गजाआड केले ..आनंद गिरी हा पंचतारांकित साधू ज्याने घडविला तो गुरू नरेंद्र गीरींच्या आत्महत्येस कारणीभूत ठरला आहे ..त्याच्या विरोधात तशी तक्रारच दाखल झाली आहे ..आनंद गिरी उंचपुरा , गोरागोमटा अतिशय देखणा तरुण साधू केवळ 10 वर्षाचा असताना राजस्थानमधून उत्तराखंडात दाखल झाला.आखाड्यात परंपरानुसार शिस्यांना दीक्षित केल्या जाते ..त्यांना मग उपाधी दिल्या जाते ..आनंद गिरीचा परीचय काहीच वर्षात नरेंद्र गिरीचा शीष्य स्वरूपात झाला ..इंग्रजी भाषेसह हिंदीवर कमालीचे प्रभुत्व असणारा आनंदगिरी अल्पावधीत प्रयागराज मध्ये लोकप्रिय झाला ..,साधूच्या वेशात बुलेटवर स्टंट करणारा आनंदगिरी युवकांचा आयकॉन झाला.. नरेंद्र गिरी यांच्या शिष्यात आनंदगिरी अव्वल स्थानावर होता ..नरेंद्र गिरी कमी बोलत होते ..मग हनुमान मंदिरात दर्शनाला येणाऱ्या पंचतारांकित भक्तांसोबत इंग्रजीत तोंड वाजविण्यासाठी नरेंद्र गिरी हे आनंद गिरीला पुढे करीत ..यातून त्याचा दबदबा पोलीस अधिकारी ,राजकारण्यांच्या वर्तुळात वाढला..तो मग भस्मासुर होऊन गुरू नरेंद्र गिरीच्या मागे धावत सुटला ..त्याने वाघांबरी मठात प्रचंड घोळ असल्याची तक्रार केली ..मठाच्या जमिनी नरेंद्र गिरी कवडीमोल भावाने विकत असल्याचा आरोप आनंद गिरीने केला ..पण त्याची भट्टी जमली नाही ..निरंजन आखड्यांसमवेत अवघ्या साधू संतांनी नरेंद्र गिरी यांच्या समर्थानात उडी घेताच भेदरलेल्या आनंद गिरीने तक्रारी मागे घेत गुरू नरेंद्र गिरी यांची माफी मागितली ..पण दंश घेण्याचे काम त्याने सोडले नाही ..नरेंद्र गिरी यांनी त्याला माफ तर केले पण त्याची वाघांबर मठ व निरंजन आखड्यातून हकालपट्टी केली ..,दरम्यान आनंदगिरी याने योग गुरू अशी आपली प्रतिमा तयार केली ..आनंद हा योगगुरू स्वरूपात आस्ट्रेलियात गेला होता ..तेथे त्याने एक महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्यामुळे त्याला।गजाआड व्हावे लागले ..कसा बसा तेथून तो भारतात परतला ..त्यानंतर तो नरेंद्र गिरी यांना ब्लॅकमेल करू लागला ..आता खर खोटं तपासात बाहेर पडेल पण सरकारने धार्मिक स्थळावर तिरपी नजर ठेवणे गरजेचे आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *