गडचांदूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – आ. सुभाष धोटे

दि.१२/०३/२०२१ मोहन भारती 

कोरपना – राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या गडचांदूर येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन शुक्रवारी संपन्न झाले.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते झाले तर अध्यक्षस्थानी कोरपना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल थिपे उपस्थित होते. यावेळी राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे, नगराध्यक्षा सविता टेकाम, माजी सभापती नोगराज मंगरूळकर, हंसराज चौधरी, नामदेव येरणे, बाळासाहेब मोहितकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र अरोरा, माजी सरपंच शिवकुमार राठी, प्रा. डॉ. हेमचंद दुधगवळी, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संतोष महाडोळे, गटनेता विक्रम येरणे, नगरसेवक पापय्या पोन्नमवार, राहुल उमरे, अरविंद मेश्राम, अर्चना वांढरे, जयश्री ताकसांडे, सागर ठाकुरवार, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शैलेश लोखंडे, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष रुपेश चुधरी, आशिष वांढरे, अतुल गोरे, देविदास मुन, शेख अहमद भाई, कंत्राटदार निखिल लेडांगे, अक्षय मंगरूळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते गडचांदूर ते पिंपळगाव बाजार समितीकडे जाणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ,
गडचांदूर जुनी वस्ती येथील ऐतिहासिक बुद्धभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे व रपट्याचे बांधकाम करणे व गडचांदूर येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था, गडचांदूरकरीता सभागृहाचे बांधकाम करणे इत्यादी विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *