आ. महेश बालदी यांच्या वाढदिवसा निमित्त पाले गावातील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 30 जुलै उरण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पाले येथे उरणचे दमदार आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शाळा व्यवस्थापन कमिटी व भारतीय जनता पक्षाचे गाव अध्यक्ष तथा ग्रामविकास कमिटीचे अध्यक्ष अमित म्हात्रे, भाजपा चिरनेर जिल्हा परिषद युवा चिटणीस पंकेश म्हात्रे ,उपअध्यक्ष गोरक्षनाथ म्हात्रे, युवा अध्यक्ष रमाकांत म्हात्रे, युवा उपाध्यक्ष प्रदीप म्हात्रे, सुरेश म्हात्रे,मच्छिंद्र म्हात्रे, हरिश्चंद्र म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे, कमलाकर म्हात्रे,शरद म्हात्रे, शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष मेनन म्हात्रे, सुरेंद्र म्हात्रे, शाळेचे मुख्याध्यापक उपेंद्र ठाकूर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी आमदार महेशशेठ बालदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *