महात्मा गांधी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक सुरेश मेश्राम यांना भावपूर्ण निरोप व सत्कार

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,

महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथील जेष्ठ शिक्षक श्री. सुरेश ल.मेश्राम नियत वयोमानानुसार प्रदीर्घ सेवेनंतर 30 जुलै ला सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने शाळेत त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका तथा प्राचार्या सौं स्मिताताई चिताडे होत्या . प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापक अनिल काकडे,उपप्राचार्य विजय आकनूरवार, पर्यवेक्षक एच बी मस्की उपस्थित होते. मुख्याध्यापिका सौ स्मिता चिताडे यांच्या शुभ हस्ते सुरेश मेश्राम यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री.संजय पोगुलवार, श्री.प्रशांत धाबेकर ,तसेच अतिथीनि सुरेश मेश्राम यांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय कार्याची प्रशंसा करून भावी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या. सुरेश मेश्राम यांनी सत्काराला उत्तर देताना शाळेबद्दल तसेच संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली,
कार्यक्रमाचे संचालन मनोहर बुऱ्हाण यांनी केले तर आभार वैशाली हेपट यांनी मानले .
या प्रसंगी पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *