जासई विद्यालयात लोकनेते दि.बा. पाटील साहेब यांची पुण्यतिथी भक्तीभावाने साजरी.

 

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 24 जून शिक्षण क्षेत्रात सुप्रसिद्ध असलेल्या रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील जुनियर कॉलेज, जासई या विद्यालयात लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांची पुण्यतिथी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भक्तिभावाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी 1984 च्या लढ्याचे नेतृत्व केलेल्या रणरागिणी भारतीताई पवार, शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष आणि भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील, दि.बा.पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील तसेच लता सरनाईक, प्रभाकर पाटील, सुभाष पाटील, महेश लाड, जासई गावचे सरपंच मा. संतोष घरत, धर्माशेठ पाटील, ह.भ. प. धावजी महाराज, ह.भ.प. गोपीनाथ ठाकूर, यशवंत घरत,डी.आर. ठाकूर, अमृत ठाकूर, अविनाश पाटील अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी लाभली होती. विद्यालयाचे प्राचार्य आणि रयत शिक्षण संस्थेचे लाइफ वर्कर अरुण घाग सर व विद्यालयाचे सर्व सेवक वृंद व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या प्रांगणातील पंच महा विभूतींच्या पुतळ्यांचे पूजन तसेच कर्मवीर अण्णांच्या पुतळ्याचे व दि.बा. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी 1984 च्या लढ्याचे नेतृत्व केलेल्या रणरागिणी भारतीताई पवार यांच्या शुभहस्ते पालखीचे पूजन करून सर्व मान्यवरांनी पालखीचे पूजन भक्तिभावाने केले. पालखीची मिरवणूक गावातून ढोल-ताशांच्या लेझिम पथकाच्या गजरात काढण्यात आली .या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने जनसमुदाय सामील झाला होता.यावेळी दि बा पाटील यांच्या स्मृतींना,आठवणींना या कार्यक्रमातून उजाळा मिळाला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक नुर शेख सर यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *