स्व.वैभवदादाचं पुण्यस्मरण नित्य व्हावे हीच मनी जाण. आदिवासी बांधवांना वाटप केलं जीवनावश्यक किराणा सामान.

लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबा

उरण दि 24 जून प्रत्येक माणसाच्या जीवनात जसा आनंद हा काही काळापुरता क्षणभंगूर वेळेचा सोबती असतो तसंच दुःख सुद्धा चिरकाल टिकणारं नसतं फक्त त्या दुःखावर मात करत त्यातून सुद्धा आनंद कसा शोधता येईल याची कला अगवगत असणं खूप महत्वाचं आहे.पाच वर्षा पूर्वी अश्याच एका हृदयपिळवटून टाकणाऱ्या घटनेत रस्ते अपघातात आपला काळजाचा तुकडा हरपलेल्या त्या संपूर्ण म्हात्रे कुटुंबावर दुःखाचं आभाळ कोसळलं पण त्या दुःखाला कुरवाळत न बसता त्यातून सावरत आपल्या लाडक्या भावाच्या पवित्र स्मृतीतुन आठवणींचा सुगंध सामाजिक कार्याच्या माध्यमातून सदैव दरवळत राहावा म्हणून स्वर्गिय वैभव गजानन म्हात्रे ( आबा) यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांच पुण्यस्मरण व्हावे आणि त्या पुण्यस्मरण दिनी आपल्या हातून काही तरी सत्कार्य व्हावे म्हणून जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेल आणि स्वर्गिय वैभवदादा म्हात्रे (आबा) यांच्यां बहीण -भावांच्यां आणि संपूर्ण म्हात्रे परिवाराच्या औदार्यातुन आणि केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या पुढाकारातून आज उरण तालुक्यातील रानसई येथील खैरकाठी आदिवासी वाडी आणि भुऱ्याची वाडी या आदिवासी वाड्यांवर त्या गरीब गरजूवंत आदिवासी बांधवांना तांदूळ,मुगडाळ,गोडेतेल,साखर, मीठ अश्या जीवनावश्यक वस्तूं किराणा सामानाचे वाटप करण्यात आले.

केअर ऑफ़ नेचर सा. संस्थेच्या पुढाकाराने आणि राजू मुंबईकर यांच्या सहकार्यानं साकार झालेल्या ह्या आदर्शवत कार्यक्रमात ह्या कोरोना सारख्या महाभयंकर काळातुन सावरत चाललेल्या ह्या आदिवासी बांधवांना थोड्या वेळच्या शिदोरी करीता का होईना पण संकट समयी मिळालेलं ह्या जीवनावश्यक वस्तूं ,किराणा सामानानं त्या आदिवासी बांधवांच्यां चेहऱ्यावरचा तो ओसंडून वाहणारा आनंद पाहण्या जोगा होता.त्यांना मिळालेलं हे तांदूळ,गोडेतेल,मुगडाळ,साखर,मीठ अश्या प्रकारचं जीवनावश्यक वस्तूंचं किराणा समान अगदी आनंदात घेऊन जात असतानां त्यांनी भावभरल्या मनाने दिलेले आशीर्वाद नक्कीच म्हात्रे कुटुंबियांकरिता पुण्यफळ देणारं ठरेल आणि स्व.वैभव दादांच्या स्मृतीनां निरंतर उजाळा देत राहील एवढ मात्र नक्की !…

स्व.वैभव गजानन म्हात्रे( आबा ) यांच्या पुण्यस्मरण दिनी जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेल आणि त्यांच्या बहिण – भावांच्यां आणि संपूर्ण म्हात्रे परिवाराच्या औदार्यातून आणि राजू मुंबईकर यांच्या सहकार्यातून साकारलेल्या ह्या प्रेरणादायी कार्यक्रमावेळी अनिलजी घरत(उरण तालुका सचिव – आगरी,कोळी,कराडी संघर्ष सा.संस्था ), रानसईचे सामाजिक कार्यकर्ते पद्मा शिंगवा आणि वाडीवरील सर्व आदिवासी बांधव आणि महिला भगिनीं मोठया संख्येने उपस्थित होते.हा अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भावभरल्या वातावरणात संपन्न झाला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *