आर्यारवी एंटरटेनमेंट प्रस्तुत ७७७ रुपयात बाबा, शिदोरी आणि खलबत्ता यातीन सामाजिक लघुपटांचा सादरीकरण सोहळा संपन्न….!

लोकदर्शन मुंबई-दादर👉गुरुनाथ तिरपणकर
पत्रकार
मोबाईल – ९३२३६६२६१९
आर्यारवी एंटरटेनमेंट प्रस्तुत शनिवार दिनांक २३ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० ते ७.३० दरम्यान मुंबईतील प्लाझा सिनेमागृह मिनी थेटर मध्ये लघुपट फेस्टिवल सोहळा साजरा करण्यात आला. या लघुपट सोहळ्यात अनेक सिने-नाट्य अभिनेते, तंत्रज्ञ, दिग्दर्शक, निर्माते यांनी आपली उपस्थिती दर्शविली. या सोहळ्यात प्रामुख्याने ७७७ रुपयात बाबा, शिदोरी आणि खलबत्ता या तीन सामाजिक संदेश देणाऱ्या लघुपटांचे सादरीकरण करण्यात आले. या संपुर्ण सोहळ्याचे निवेदन प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी विनायक कामथ यांनी आपल्या दिलखुलास वाणीने करून सर्व रसिक प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. त्याचबरोबर रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलेल्या शिदोरी आणि ७७७ रुपयात बाबा या लघुपटासाठी गेली वर्षभर आम्हांला ज्यांनी सहकार्य केले असे मंत्रालयातील माजी गृह सचिव अधिकारी सुरेश पटनाईक यांनी लघुपट सादरीकरणासाठी राज्यशासनाअंतर्गत दखल घेऊन शाळांशाळांत प्रयोग व्हावेत यांसाठी मी नक्की प्रयत्न करेन असे आश्वासन दिले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन ज्येष्ठ समाजसेवक-पत्रकार राजेंद्र लकेश्री, जनजागृती सेवा समिती, बदलापूर चे संस्थापक-अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, वेस्टर्न फिल्म्स अँड प्रोड्यूसर्स असोसियेशन चे जनरल सेक्रेटरी आणि शिवसेना चित्रपट शाखा, महाराष्ट्र राज्य चे सचिव दिलीप दळवी, प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक अनंत सुतार, निर्मिती प्रमुख-पत्रकार-दिग्दर्शक गणेश तळेकर, प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक सुहास कर्णेकर, प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक अनिल सुतार, पुरोगामी पत्रकार संघ राज्य कोकण विभागाचे उपाध्यक्ष विजय मोरे, अभिनेता संदीप रावजी जाधव, प्लाझा सिनेमागृहचे व्यवस्थापक योगेश मोरे, ज्येष्ठ बुजूर्ग अभिनेते हरिकाका भंडारे, जगद्विख्यात कलावंत फणीवादक शशिकांत खानविलकर, पत्रकार बाळकृष्ण कासार, पत्रकार शशिकांत सावंत, अभिनेता सुरेश डाळे पाटील, मनसे चित्रपट सेनेचे संयुक्त सरचिटणीस विशाल हळदणकर, मनसे चित्रपट सेना अंधेरी शाखेचे उपाध्यक्ष संजय देवळे, अभिनेते डॉ किशोर खुशाले, प्रसिद्ध फोटो डिझायनर मनिष व्हटकर, समाजसेवक विनायक कामथ, तसेच अक्षदा मोरे, दिपंती साळवी, आर्य तेटांबे, नैतिक कदम, दिपाली मोरे, छाया पालव, यशवंत मुसळे, आदी कलावंत, मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी प्रेरणादायी मनोगते व्यक्त करून सहभागी लघुपटातील सहभागी कलावंतांना प्रोत्साहीत केले. कार्यक्रमाच्या शेवटी आर्यारवी एंटरटेनमेंटचे सर्वेसर्वा महेश्वर तेटांबे यांनी उपस्थित मान्यवरांचे आणि लघुपटातील कलावंतांचे आभार मानले. अशा तऱ्हेने प्लाझा मिनी थेटर मधिल हा लघुपट सोहळा सिनेकलावंतांच्या उपस्थित जल्लोषात संपन्न करण्यात आला.

गुरुनाथ तिरपणकर
पत्रकार
मोबाईल – ९३२३६६२६१९

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *