या’ साधूचे 50 ‘आईबाबा

By : Shankar Tadas
लोकदर्शन👉
नाशिककरांना अन्नदानासाठी आवाहन करीत आहे एक साधू. नाशिक शहरात वास्तव्यास असलेले काही बेघर वृद्ध लोक पाहून त्यांना कळवळा आला. यांच्या रोजच्या जेवणाची व नाश्त्याची व्यवस्था करावयाची असे त्यांनी ठरविले. हे निराधार लोक आता उपाशी राहु नये, याकरिता ते जनतेला मदतीचे आवाहन करीत आहेत. निव्वळ प्रवचन दिल्याने समाज घडत नाही. तर कृती महत्वाची असते हेच या साधूनी समाजाला दाखवून दिले आहे.
*महाराजांनी केलेले आवाहन*
सर्व नाशिककरांना अन्नदानासाठी आवाहन. हे आहेत नाशिक शहरात वास्तव्यास असलेले ५० बेघर वृद्ध लोक. यांच्या रोजच्या जेवणाची व नाश्त्याची व्यवस्था करावयाची आहे. नाशिककरांनी पुढाकार घ्यावा. कोणीही उपाशी राहु नये हाच सर्वतोपरी प्रयत्न. हे भिकारी नाही – हे असे लोक आहे – ज्यांना त्यांच्या आप्तस्वकीयांनी वाऱ्यावर सोडून दिले आहे. यांच्या निवासाची व्यवस्था आहे – गाडगे महाराज पूलाजवळ.
50 बिछान्यांची आवश्यकता आहे.
संपर्क करा.
– #स्वामी_श्रीकंठानंद_9822703688
Shri Ramakrishna Arogya Sansthan

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *