Home
Home Breaking News “ज्ञानदीप विद्यालय व वाल्मिकेश्वर विद्यालयात विद्यार्थी प्रवेशोत्सव कार्यक्रम”

“ज्ञानदीप विद्यालय व वाल्मिकेश्वर विद्यालयात विद्यार्थी प्रवेशोत्सव कार्यक्रम”

 

लोकदर्शन वालुर/प्रतिनिधी👉महादेव गिरी

वालुर येथील स्वर्गीय नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानदिप विद्यालय व वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी शाळा प्रवेशोत्सोव कार्यक्रम दि.15 जुन बुधवार रोजी उत्साहात पार पडला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.डि. भोकरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक प्रविण क्षीरसागर बि.बि.मोरे, जि.एम. कावळे, व्हि.एन. बोंडे ,सौ.एस. आर. सोनवणे, सौ जी.आर. मळी,सौ जे.बि.शिंदे,एस. ए.महाडिक, आदी उपस्थित होते. यावेळी सरस्वती पुजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी नवीन प्रवेश घेण्याऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळीमुख्याध्यापक प्रविण क्षीरसागर, बि.बि.मोरे, जि.एम. कावळे,व्हि.एन,बोंडे.जि.आर. मळी, सौ.जे.बि.शिंदे ,एस.ए.महाडिकयांनी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा समारोप मुख्याध्यापक एस.डि.भोकरे यांच्या अध्यक्षीय भाषणाने करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार व्हि.एन. बोंडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here