Home
Home शैक्षणिक सुनील दबडे यांचे १३ जून रोजी सावळज येथे व्याख्यान

सुनील दबडे यांचे १३ जून रोजी सावळज येथे व्याख्यान

 

लोकदर्शन👉 राहुल खरात

जेष्ठ साहित्यिक व व्याख्याते प्रा . सुनील दबडे यांचे १३ जून रोजी तासगाव तालुक्यातील सावळज येथील सिध्देश्वर पतसंस्थेत व्याख्यान होणार आहे .
” चला आनंदाने जगुया ” . या विषयावर या दिवशी सकाळी ११.०० वाजता होणाऱ्या मराठमोळ्या बहारदार व्याख्यानाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन सावळजच्या जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष सिदगौंड पाटील, प्रकाश पाटील, महादेव चिवटे तसेच खजिनदार बापुसाहेब देसाई यांनी केले आहे . .
प्रा . सुनील दबडे यांचे यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी , जेष्ठांसाठी शेकडो व्याख्यानाचे कार्यक्रम जिल्हात व जिल्हया बाहेर झाले आहेत . त्यांची चार पुस्तके प्रसिद्ध असून त्यांना आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत . अनेक बालकुमार साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे त्यांनी भुषविली आहेत . शासनामार्फत आयोजित अनेक परिसंवादामधून त्यांनी विविध विषयांवर आपले विचार मांडले आहेत . गेली २५ वर्षे ते राज्यातील अनेक जिल्ह्यांत प्रबोधनाचे काम करीत आहेत . डोंबिवली येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातील बोलीभाषा काव्य संमेलनात त्यांची निमंत्रीत कवी म्हणून निवड झाली होती . अनेक साहित्य संमेलनांचे त्यांनी यशस्वी संयोजनही केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here