महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मोठे योगदान. — आमदार सुभाष धोटे.

लोकदर्शन 👉 मोहन भारती


⭕आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते भव्य महिला बचत गट मेळाव्याचे उद्घाटन.

⭕१० उत्कृष्ट स्वयंसहाय्यता महिला बचत गटांचा सन्मान, माहिती पुस्तिकेचे प्रकाशन.

राजुरा (ता.प्र) :– चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित चंद्रपूर शाखा राजुरा द्वारा छत्रपती शिवाजी महाराज संकुल राजुरा येथे आयोजित भव्य महिला बचत गट मेळाव्याचे उद्घाटन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राजुरा तालुक्यातील १० उत्कृष्ट स्वयंसहाय्यता महिला बचत गटांना मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्वयंसहाय्यता बचत गट माहिती पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या प्रसंगी उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, ग्रामीण व शहरी भागातील स्त्रियांना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी होण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मोठे योगदान प्राप्त होत आहे. आर्थिक उन्नती, सामाजिक आणि राजकीय प्रगतीसाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून मिळणारे कर्ज आणि मार्गदर्शन घेऊन अनेक महिला प्रगती साधत आहेत. महिलांचा विकास हाच बँकेचा ध्यास आहे, तसेच गरीब, गरजू, शेतकरी, शेतमजूर अशा सर्व घटकांना न्याय देण्यासाठी बँक सहकार्य करीत आहेत. अनेकांनी यातू लाभ घेऊन अडचणीतून मार्ग काढून प्रगती साधली आहे. तर जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी सांगितले की महिलांना बचत गटाच्या माध्यमातून स्वावलंबी करण्यासाठी बँकेतून कर्ज देऊन लघु उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बँकेच्या माध्यमातून बचत गटांना १० टक्के व्याज दराने कर्ज दिले त्यापैकी ३ टक्के व्याज परतावा सन २०१७-१८ सन २०१८-१९ सन २०१९-२० व सन २०२१-२२ च्या व्याज परतावा एकूण ३ कोटी ६७ लक्ष रुपयांचा प्रस्ताव नाबार्ड कडे सादर केला आहे आणि तो प्राप्त करून घेतला आहे. बँकेच्या महिला बचत गटांच्या खात्यात ३ टक्के रक्कम वळती करण्यात येणार आहे. आता महिला बचत गटांना केवळ ७ टक्के व्याजदर पडणार आहे.
या प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, माजी अध्यक्ष तथा संचालक शेखर धोटे, संजय तोटावार मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर, विभागीय अधिकारी श्याम गरडे, केशव बोढे, जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्मचारी, राजूरा तालुक्यातून आलेल्या महिला बचत गटातील महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *