स्व. शंकरराव देशमुख यांच्या जन्मशताब्दी महोत्सव निमित्य विविध कार्यक्रम

लोकदर्शन विभागीय प्रतिनिधी👉 शिवाजी सेलोकर

राजुरा : स्वातंत्र संग्राम सैनिक, तथा राजुराचे माजी आमदार स्व. शंकरराव सितारामपंत देशमुख यांचे २०२२ हे जन्मशताब्दी वर्ष म्हणून राजुरा शहरात शैक्षणिक, सामाजिक कार्यक्रमासह विविध स्पर्धा घेत साजरा करण्याचा निर्णय नुकत्याच शासकीय विश्रामगृह राजुरा येथे झालेल्या समन्वय समितीच्या सभेत घ
घेण्यात आला.

हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यात महत्वपूर्ण योगदान असलेले स्वातंत्र संग्राम सैनिक राजुरा नगर परिषदेचे तेवीस वर्षे नगराध्यक्ष पद भूषविणारे माजी आमदार स्व. शंकरराव देशमुख यांच्या राजुरा शहराची पायाभरणी करण्याच्या कार्याची नवीन पिढीला माहिती अवगत व्हावी या दृष्टीकोनातून राजुरा शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून २०२२ हे वर्षे शंकरराव देशमुख यांचे जन्मशताब्दी महोत्सवी वर्ष म्हणून (दि. २५ मार्च) साजरे करण्याचे ठरविले आहे. देशमुख यांच्या जन्म २५ मार्च १९२२ रोजी राजुरा येथे झाला, वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला नंतर स्वातंत्र आंदोलनात व त्यानंतर रझाकार विरुद्ध लढा दिला यावेळेस त्यांना आसिफाबाद येथे जेल मध्ये कारावास भोगावा लागला. राजुरा शहराच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांच्या कार्याला उजाळा देण्याच्या दृष्टीकोनातून शालेय विद्यार्थ्यांसाठी, महिलांकरिता शैक्षणिक, सामाजिक कार्यक्रम व विविध स्पर्धेचे आयोजन केले असून यात विविध क्षेत्रातील नामांकित जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येत आहे.

यावेळी कार्यक्रमाची रूपरेषा प्रा. बी. यु. बोर्डेवार यांनी मांडली तर आभार प्रदर्शन अनिल बाळसारफ यांनी मानले. सभेला राजुरा व्यापारी असोसिशनचे अध्यक्ष संदीप जैन, सचिव संतोष रामगिरवार, राजुरा पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष एजाज अहमद, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. बी. यु. बोर्डेवार, जेष्ठ नागरिक मिलिंद गड्डमवार, पत्रकार अनिल बाळसराफ, मसूद अहमद, आंनद चलाख, डॉ. उमाकांत धोटे, मुखरू सेलोटे, श्रीकृष्ण गोरे, फारुख शेख, सागर भटपल्लीवार, दीपक शर्मा, संतोष कुंदोजवार, अनंता डोंगे उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *