आटपाडीच्या सरपंच वृषाली पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले ! आटपाडी पोलिओ मोहीम संपन्न !

 

लोकदर्शन आटपाडी ; 👉राहुल खरात

आटपाडी ग्रामपंचायत अंतर्गत विविध ठिकाणी पोलिओ लसीकरण मोहीम संपन्न झाली.
आटपाडी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील व इतर मान्यवर यांच्या हस्ते पोलिओ लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. नेहमीच आरोग्याच्या बाबतीत आटपाडीकर दक्ष असल्याने सर्वच ठिकाणी या लसीकरण मोहीमेस उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका अंगणवाडी सेविका तसेच लसीकरणाचे महत्त्व जाणून माता पालकांनी त्यांच्या बालकांना लसीकरण करून घेतले त्या सर्वांमुळे लसीकरण मोहीम यशस्वी पार पडली त्यामुळे सरपंच वृषाली पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले!

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *