मराठी राजभाषा दिनानिमित्त डॉ. प्रविण निचत, ह्यांना महाराष्ट्र स्वामिमन गौरव पुरस्कार २०२२


लोकदर्शनप्र तिनिधी मुंबई 👉राहुल खरात

जय महाराष्ट्र, वृत्तपत्र लेखक व कवी आयोजित मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र स्वामिमन गौरव पुरस्कार २०२२ वितरण सोहळा व निमंत्रितांचे माय मराठी जागर कवी संमेलन शनिवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन, लोकमान्य सभागृह, महापालिका मार्ग, आझाद मैदान जवळ. सी.एस.एम.टी.(व्ही.टी.) स्टेशन समोर, मुंबई येथे साजरा करण्यात आला.

मराठी राजभाषा दिनानिमित्त बदलापूर येथील सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ व ऍक्युपंचरिस्ट डॉक्टर प्रवीण निचत, ह्यांना मा. अनिलजी थत्ते ह्यांचा हस्ते महाराष्ट्र स्वामिमन गौरव पुरस्कार २०२२ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. डॉ. प्रविण निचत ( अध्यक्ष होप फौंडेशन), ह्यांच्या कार्याची वेगवेगळ्या संस्थांनी दखल घेऊन त्यांना जवळपास 165 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांचे होप फाउंडेशन मार्फत समाजासाठी विविध उपक्रम चालू असतात, त्यामध्ये अन्न वाटप, औषध वाटप, कपडे वाटप व इतर गरजेच्या वस्तूंचा समाविष्ट आहे. ते वैद्यकीय क्षेत्रात निसर्गोपचार चा प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वाना मोफत टेलिफोनद्वारे सर्वच रोगांवर “घरगुती उपाय” सांगतात. त्याचे ते एकही रुपया आकारत नाही. अशी ही त्यांची आगळी वेगळी समाज भक्ति व निस्वार्थ भावनेने केलेले समाजकार्य गेले कित्येक वर्षांपासून करत आहेत.

ह्या कार्याक्रमालाउदघाटक म्हणूं लाभले होते मा. अरविंदजी सावंत, (खासदार व अध्यक्ष भा.कामगार सेने व माजी केंद्रीय मंत्री,भारत सरकार,प्रमुख अतिथी होते मा. अभिजितजी राणे ( कामगार नेते व संपादक दैनिक मुबई मित्र), मा. दीपाली भोसले-शय्येद( अभिनेत्री व अध्यक्ष – दीपाली भोसले सय्यद चारीटेबलें ट्रस्ट ), मा. अनिलजी थत्ते, (जेष्ठ पत्रकार व मराठी बिग बॉस फेम) मा. चारुशीला देशमुख ( संचालक – राष्ट्र संत गाडगे महाराज आश्रम शाळा व समाज सेविका), मा. डॉक्टर प्रवीण निचत ( अध्यक्ष होप फौंडेशन), मा. मकरंद वंगणेकर (जेष्ट कवी) व इतर.निवेदक मा. गुरुदत्त वाकडेकर व संचालक मा. सुरज भोईर (संस्थापक – सदस्य, जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक कवी महासंघ, मुक्त पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता) असे मान्यवर उपस्तिथ होते.

सर्व कवीनी अतिशय उत्स्फुर्त माय मराठी भाषे विषयी आपल्या कवितेचे सदिरीकरण केले.सर्वानी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून जाहीर मागणी करण्यात आली.

मा. दीपाली भोसले ह्यांचा सत्कार डॉक्टर प्रवीण निचत ह्यांच्या हस्ते करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्कारार्थ्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेछया देण्यात आल्या.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *