विदर्भ महाविद्यालय जिवती येथे सामूहिक सूर्यनमस्कारांचे वेगवेगळे कार्यक्रम थाटामाटात संपन्न

लोकदर्शन 👉

जिवती- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 75 कोटी सूर्यनमस्कार संकल्प कार्यक्रमांतर्गत क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली द्वारा प्रत्येक महाविद्यालयाला सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रम घेण्याचे सुचविलेले आहे. त्या अंतर्गत विदर्भ महाविद्यालय जिवती येथे क्रीडा विभाग तथा राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारा 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी यादरम्यान सामूहिक सूर्यनमस्कार करण्यासाठी मार्गदर्शनपर आणि प्रात्यक्षिक स्वरूपाचे अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी ‘ सूर्यनमस्काराचे मानवी जीवनातील महत्त्व’ या विषयावर आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करतांना सदर महाविद्यालयाच्या *प्राचार्य डॉ. एस. एच. शाक्य* यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांसमक्ष सूर्यनमस्कार करण्याच्या वेगवेगळ्या शास्त्रीय पद्धती, विधी आणि स्थिती जसे प्रणामासन,हस्त उत्तानासन,उत्तानासन, अश्व संचालनासन, चतुरंग दंडासन, अष्टांग नमस्कार, भुजंगासन, अधोमुक्त श्वानासन, अश्व संचालनासन आणि सूर्यनमस्कारावेळी कराव्या लागणाऱ्या श्वसनक्रिया जसे पूरक (दीर्घ श्वास, आत घेणे), रेचक (दीर्घ श्वास बाहेर सोडणे), कुंभक (श्वास रोखून धरणे) यावर विस्तृत प्रकाश टाकला. सोबतच त्या त्यांच्या *मार्गदर्शनपर भाषणात* म्हणाल्या की, ” *पृथ्वी आणि सूर्य हे एका विशिष्ट प्रकारे एकमेकांच्या संपर्कात आहेत. मानवी शरीर हे पंच तत्त्वांनी बनलेले आहे. तत्वे जसे की पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांचा समावेश शरीरात होत असतो. या पंच तत्त्वांचा शरीरात असलेला मेळ व्यवस्थित बसला की आरोग्य प्राप्ती होत असते. तो मेळ बसवण्याचे काम सूर्यनमस्कार करत असतो. त्यासाठी तो खूपच उपयोगी आणि फायदेशीर ठरतो आणि सूर्याच्या कोवळ्या किरणांचा लाभ आपल्या जीवनात, म्हणजेच शारीरिक, मानसिक आणि आत्मिक अस्तित्वात करून घ्यायचा असेल तर योगासने करायला सुरुवात करा आणि मुख्यतः सूर्यनमस्कार घालायला सुरू करावा. सूर्य नमस्कार घालण्याचा लाभ मानवी शरीरासाठी होतोच शिवाय मानसिक समाधानही प्राप्त होते* “. असे मोलाचे विचार त्यांनी प्रतिपादित केले.
यासोबतच एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. बी. देशमुख यांनी विद्यार्थ्यांकडून सामूहिक सूर्नमस्काराचे प्रात्यक्षिक करून घेतले. या सात दिवसांच्या कालावधीत होणाऱ्या सूर्यनमस्कार संदर्भात प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन क्रीडा समन्वयक डॉ. श्रीकांत पानघाटे यांनी पार पाडले. महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी हे सामूहिक सूर्यनमस्कारांचे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष कष्ट उपसले. तर विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांना भरभरून आणि उस्फुर्त प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदविली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *