माता रमाईचा त्याग बहुजन समाजातील स्रियांना मोलाचा ठरला… नगरसेविका राजश्री मखरे

लोकदर्शन 👉 राहुल खरात सर

  1. इंदापूर : दि. ७ – डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला आजन्म स्वतःला वाहून घेणा-या या त्यागी रमाईमुळेच आज भारतीय संविधानाचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ठरले आणि त्यांच्यामुळे प्रत्येक महिला आज उच्चपदावर कार्यरत आहेत. त्यामुळे त्याचे सर्व श्रेय हे माता रमाईला द्यावे लागेल. त्यांचा हा त्याग आज देशातील सर्व बहुजन समाजातील स्रियांना मोलाचा ठरला आहे. असे प्रतिपादन इंदापूर नगरपरिषदेच्या विद्यमान नगरसेविका राजश्री मखरे यांनी केले.
    पुणे जिल्हा आरपीआय संघटक-सचिव शिवाजीराव मखरे यांचे प्रमुख उपस्थितीत येथील डाॅ बाबासाहेब आंबेडकर नगर मधील जेतवन बुद्ध विहारात रमाई जयंतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिवाजीराव मखरे, मनिषा मोरे मॅडम, हनुमंत कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
    सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्धांच्या मुर्तीस पुष्प तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व रमाईच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिप प्रज्वलन केले.
    याप्रसंगी प्रा. बाळासाहेब मखरे, प्रा. अशोक मखरे, ॲड. सुरज मखरे, पीआरपीचे शहराध्यक्ष शिवाजी मखरे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग युवक तालुकाध्यक्ष शुभम मखरे, अरुण मखरे, प्रशांत मखरे, अनिल साबळे, तुषार मखरे, हेमंत मखरे, रोहित मखरे, बाळु मखरे, अजय कांबळे, अनिकेत खरात, राजू मखरे, अमोल मखरे, आकाश मखरे, बोधिसत्व मखरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
    कार्यक्रमासाठी महिलांची उपस्थित लक्षणीय होती यामध्ये हौसाबाई मखरे, तप्ताबाई मखरे, सखुबाई मखरे, शारदा मखरे, नंदा मखरे, निर्मला मखरे, माया मखरे, रेखा मखरे, शिला लोंढे, शितल गाडे, शोभा मखरे, राणी मखरे, कोमल मखरे, दिक्षा मखरे, जयमाला सोनवणे, आम्रपाली मखरे, काजल मखरे, मयुरी मखरे, पौर्णिमा मखरे, अनुष्का काकडे आदी उपस्थित होत्या.
    कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. बाळासाहेब मखरे यांनी तर आभार प्रदर्शन शिवाजी मखरे यांनी केले.
लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *