भटके विमुक्त हक्क परिषद भंडारा जिल्हा चा वतीने अनिताताई भुरेंचे अभिनंदन                               

लोकदर्शन 👉 महेशजी गिरी


*भटके विमुक्त जाती समाजातील व काँग्रेस पक्षाचा उमेदवार सौ. अनिताताई एकनाथजी भुरे यांचा जिल्हा परिषद निवणुकीत दणदणीत विजय*
भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणूकीत सिल्ली जिल्हा परिषद क्षेत्रातु अतिशय अटीतटीच्या लढतीत धन्याढ्य व नामवंत प्रतिस्पर्ध्यांना मात देत निवडून आलेल्या भटक्या विमुक्त जातीच्या मकरधोकडा या छोट्याशा गावातील गरीब कुटुंबातून आलेल्या काँग्रेस पक्षाचा उमेदवार *सौ.अनिताताई एकनाथजी भुरे* ह्या विजयी झाल्या. त्या निमित्ताने त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा देण्याकरीता भटक्या विमुक्त जातीच्या तर्फे *भटक्या विमुक्त हक्क परिषद भंडारा जिल्हाध्यक्ष श्री. नितेश जीवन पुरी, सचिव इंजी. श्री. दिपक मारबते साहेब , उपाध्यक्ष डाॅ. रविंद्र बमनोटे* तरूण समाजसेवक ऍडव्होकेट तुषार देशमुख, दिनेशजी गेटमे संघर्ष समिती जिल्हा सचिव,
या सदिच्छा भेटीमध्ये महाज्योती बद्दल व्यावसायिक व शैक्षणिक विषयावर सविस्तर माहिती दिली, आपल्या समाज बांधवांचे तसेच लोकांचे पांग फेडायचे असल्यास त्यांना रोजगार व इतर बाबीचे कसे मदत करू शकता याबाबत चर्चा झाली, अनिताताई ने सर्वांच्या मदतीने आपलं गाव तसेच आपल्या क्षेत्राचा विकास साधान्याची ग्वाही दिली
अशा प्रकारे *भटके विमुक्त हक्क परिषदेचा समस्त पदाधिकारी यांचे सौ अनीताताई आणि त्यांचे पती एकनाथजी भुरे यांनी आभार मानले*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *