आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन.

लोकदर्शन। 👉 मोहन भारती


⭕जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण.

कोरपना :– आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते कोरपना तालुक्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन पार पडले. जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत पारडी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-2 चे विस्तारीकरण व पशुवैद्यकीय कर्मचारी निवासस्थानांची बांधकाम करणे, किंमत ९८ लक्ष, पारडी अप्रोज रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण, किंमत ४३ लक्ष, कोडासी (बु), शेरज (बु), लोणी आसन ते नांदाफाटा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे किंमत ५० लक्ष, कोळशी खुर्द पिपरी ते राज्यमार्ग मातीकाम व खडीकरण करणे किंमत ५० लक्ष रुपये निधी च्या विकासकामांचे भूमिपूजन तसेच ग्रामपंचायत शेरज आणि मौजा गांधिनगर येथे जलशुद्धीकरण (RO) यंत्रणेचे लोकार्पण आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी कोरपना कृ.उ.बा.स सभापती श्रीधरराव गोडे, कोरपना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, सभापती रुपाली तोडासे, जि. प. सदस्य कल्पनाताई पेचे, विनाताई मालेकर, उपसभापती सिंधुताई आस्वले, माजी सभापती श्यामभाऊ रणदिवे, संभाजी कोवे, माजी जि प सदस्य उत्तमराव पेचे, जेष्ठ नेते सुरेश मालेकर, गणेश गोडे, रोशन आस्वले यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *