मतदार संघाचा विकास हेच माझे ध्‍येय – आ. सुधीर मुनगंटीवार                                                      

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर


*⭕नांदगांव पोडे येथील विकासकामांचे उदघाटन आ. मुनगंटीवार यांनी केले प्रतिपादन*

मतदार संघाच्‍या विकासाच्‍या माध्‍यमातुन दीन, दलीत, दुर्बल, शोषित घटकांपर्यंत पोहचून त्‍यांना सर्व सुविधा प्राप्‍त व्‍हाव्‍या व मतदार संघाचा चौफेर विकास व्‍हावा हेच माझे ध्‍येय आहे, असे प्रतिपादन नांदगांव पोडे येथील विविध विकासकामांच्‍या प्रसंगी माजी अर्थमंत्री तथा लोकलेखा समितीचे अध्‍यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. नांदगांव पोडे येथे दत्‍तमंदीरासमोर ५० लक्ष रू. खर्चुन बांधलेले सभागृह, १५ लक्ष रू. खर्चुन बांधलेले आदिवासी भवन तसेच १५ लक्ष रू. खर्चुन हनुमान मंदीरासमोर बांधलेले सभागृह या सर्व सभागृहांच्‍या लोकार्पण कार्यक्रमात आ. मुनगंटीवार बोलत होते.

चंद्रपूर जिल्‍हयाला एकेकाळी आदिवासी जिल्‍हा म्‍हणून हिणविले जायचे. परंतु २०१४ मध्‍ये युती शासन आले व मी अर्थमंत्री झालो. त्‍यामुळे जिल्‍हयाला मोठया प्रमाणात निधी उपलब्‍ध करून देवू शकलो याचा मला आनंद आहे. मा. उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी चंद्रपूरसारखे कॅन्‍सर हॉस्‍पीटल बारमतीला तयार करा असे सांगणे व क्रिडामंत्री सुनिल केदार यांनी सैनिक स्‍कुल पाहिल्‍यावर नागपूरला अशा वास्‍तु का तयार होत नाहीत असे उद्गार काढले हे आपले यश आहे, असे याप्रसंगी आ. मुनगंटीवार म्‍हणाले.

गावामध्‍ये पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था तसेच हडस्‍ती येथे जगन्‍नाथबाबा मंदिराच्‍या बाजूला स्‍वच्‍छतागृहाची निर्मीती तसेच नांदगांव पोडे येथील दत्‍तमंदीराच्‍या परिसरात स्‍वयंपाकघर व स्‍वच्‍छतागृह बांधण्‍यासाठी तातडीने कारवाई करण्‍याचे निर्देश त्‍यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या अधिका-यांना तात्‍काळ दिले. डॉ. कन्‍नमवार हे निवृत्‍त झाल्‍यावर ज्‍येष्‍ठ नागरिकांची तपासणी मोफत करतात याकरिता त्‍यांचे आ. मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले. गावातील सर्वांनी शंभरटक्‍के वैक्‍शीनेशन करावे असे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी केले. या कार्यक्रमाला भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंह चंदेल, जिल्‍हा परिषद सदस्‍य अॅड. हरीश गेडाम, तालुकाध्‍यक्ष किशोर पंदिलवार, परशुराम कोरोसे, मनोहर देवूळकर, पिंटू देवूळकर, सरपंच व उपसरपंच नांदगांव पोडे, ग्राम पंचायत सदस्‍य यांची उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *