कोरपण्यात सात उमेदवारांची माघार

By : Mohan Bharti

काँग्रेस व युतीत होणार थेट लढत

कोरपना – येत्या २१ डिसेंबरला नगरपंचायत ची दुसरी सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. येथे १४ प्रभागासाठी छाननी अंती ३५ उमेदवारांचे अर्ज कायम होते. यातील सात उमेदवारानी अर्ज सोमवार दि.१३ ला मागे घेतले आहे. यामुळे आता काँग्रेस विरुद्ध युतीत थेट सामना रंगणार आहे. १७ सदस्य असलेल्या कोरपना नगर पंचायत मध्ये प्रभाग क्रमांक एक, दोन, सतरा येथील निवडणूक सुप्रीम कोर्टाचे निर्णयाने ओबीसी आरक्षण वरून स्थगित करण्यात आल्या आहे.यामुळे उर्वरित
आता चौदा ही प्रभागात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस व भाजपा, शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना युती मध्ये थेट लढत बघायला मिळणार आहे. प्रभाग क्रमांक ५,७,९,१२,१४ प्रत्येकी एक तर प्रभाग क्रमांक ८ मध्ये दोन नामांकन मागे घेण्यात आले आहे. या निवडणुकीत एकूण २८ उमेदवार रिंगणात उभे आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *