आवारपूर पोलीस चौकीचे पोलीस हवालदार सुनील मेश्राम यांना 3000 रुपये ची लाच घेताना अटक

By : Mohan Bharti

गडचांदूर :- गडचांदूर हॉटेल व्यावसायाकरिता सट्टापट्टि खेळल्याप्रकरणी सप्टेंबर महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी कारवाई करीत त्यांना जामिनावर सोडले मात्र पोलिसांच्या कारवाईत त्यांचा मोबाईल हा ताब्यात घेण्यात आला होता. तो परत देण्यासाठी तपस करणारे पोलीस हवालदार सुनील मेश्राम हॉटेल व्यावसायिकाला ५ हजारांची मागणी केली. तडजोडी अंती ३ हजार रुपये देण्याचे ठरले मात्र लाचलुचपत विभागाच्या कारवाईत पोलीस हवालदार मेश्राम याला रंगेहात अटक करण्यात आली.

Anti Corruption Department Chandrapur

तक्रारदार हे नांदाफाटा गडचांदूर ता. कोरपना , जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांचा हॉटेल व्यवसाय आहे. तक्रारदार यांचेवर पोलीस स्टेशन गडचांदूर, जिल्हा चंद्रपूर येथे सट्टापट्टिचा जुगार खेळल्याबाबत अपराध क. ३२३/२०२१ दिनांक १४/०९/२०२१ रोजी गुन्हा दाखल असून त्यामध्ये त्यांचेवर आवाळपूर पोलीस चौकी, पोलीस स्टेशन गडचांदूर येथील पोलिसांनी कारवाई करून त्यांना जामिनावर मुक्त केले आहे सदर गुन्हयाचे तपासकामी  आवाळपूर पोलीस चौकी, पो.स्टे.गडचांदूर येथील पोलीस हवालदार सुनील मेश्राम यांनी तक्रारदार यांचा मोबाइल ताब्यात घेतला होता. सदर मोबाईल परत देण्याचे कामाकरिता पोलीस हवालदार सुनील मेश्राम यांनी तक्रारदार यांना Bribe ५०००/- रू. ची मागणी केली. तक्रारदार यांना पोलीस हवालदार सुनील मेश्राम यांनी मागणी केलेली लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी ला.प्र. वि. चंद्रपूर येथील कार्यालयात येवून तक्रार नोंदविली. तक्रारदार यांनी. दिलेल्या तक्रारीप्रमाणे श्रीमती शिल्पा भरडे, पोलीस निरीक्षक यांनी गोपनीयरित्या trap सापळा रचला. त्यामध्ये  आवाळपूर पोलीस चौकीचे पोलीस हवालदार सुनील मेश्राम पो.स्टे. गडचांदूर जिल्हा चंद्रापुर यांनी तक्रारदार यांना गुन्हयाचे तपासात ताब्यात असलेला मोबाईल परत करण्याकरिता ५०००/- रुपये लाच रक्कमेची मागणी करून तडजोडी अंती ३०००/- रुपये लाच रक्कम दिनांक ०३/१२/२०२१ रोजी गडचांदूर येथील नायरा पेट्रोल पंपासमोरील झुणका भाकर दुकान समोरील रोडवर स्वतः स्वीकारल्याने त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूरच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यावरून त्यांचे विरुद्ध पो.स्टे.गडचांदूर जि. चंद्रपूर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. police constabe arrested सदरची कामगिरी राकेश ओला,   पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.नागपूर मिलिंद तोतरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.नागपूर, पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे  ला.प्र.वि.चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात शिल्पा भरडे पोलीस निरीक्षक नापोशी नरेशकुमार नन्नावरे पोशी रोशन चांदेकर, रवी ढेंगळे, वैभव गाडगे, चालक पोशी रमेश हाके सर्व पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.चंद्रपूर यांनी केली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *