

By : Mohan Bharti
गडचांदूर : गडचांदूर जवळील माणिकगड पहाडा च्या पायथ्याशी असलेल्या अमलनाला धरणाचे सौंदर्यीकरण चे काम प्रगतीपथावर आहे.अमलनाला धरणाची घळ धरणी 1981मध्ये झाली तेव्हा पासून धरणात पानी संचय सुरू झाले.अमलनाला प्रकल्प हा पहाडाच्या पायथ्याशी बांधल्याने निसर्ग रम्य वातावरण पाहण्या करीता चंद्रपूर जिल्हा तील च नव्हे गडचिरोली,यवतमाळ, नागपूर, वर्धा, तसेच आंध्र प्रदेशातील अदिलाबाद,असिफाबाद, व इतर ठिकाणाहून नागरिक मोठ्या संख्येने येत असतात, येथील लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी व नियोजन विभागाच्या नियोजनामुळे धरण परिसरात करमणुकीाठी बगीचा,जलक्रीडा,नौकाविहार,रिसोर्ट, गाझेबा ,घाट,इत्यादी साठी सात कोटीचे काम मंजूर झाले असून कामाला सुरवात सुद्धा झाली आहे.माती धरण बाधकामाच्या वेळी मातीची धूप रोखण्या करीता दगडी अश्मपटल (पिचींग) हे लाईमस्टोन दगडात बांधकाम केलेले आहे.सदर बांधकामाला चाळीस वर्ष झालेले आहे.व लाईम स्टोन दगडी अश्ममपटल (पीचींग) सतत पाण्याखाली असूनही अखंड आहे.लाइमस्टोन हा सिमेंट चा मुख्य घटक आहे,अमलनाला सौंदर्यीकरण चे काम डोंगराळ भागात असल्याने अंदाजपत्रक तयार करते वेळी पायामध्ये दगड लागणे अपेक्षित होते, परंतु बांधकामाचे पायात मुरूम,माती असल्याने काम मजबूत व टिकाऊदार होण्याच्या दृष्टीने माणिकगड सिमेंट कंपनी च्या परवानगीने जवळच पडलेला लाईमस्टन हे पायाच्या सोलिंग करीता वापरत आहे. सोलिग कामाचा मोबदला कंत्राटदारांना मिळत नसून फक्त मजबुती करीता स्वखर्चातून काम करत आहे.अशी माहिती उपविभागीय अभियंता श्री डी,एन, मदनकर,शाखा अभियंता सय्यद आमिर यांनी पत्रपरिषदेत दिली.अमलनाला धरणाचे सौंदर्यीकरण चे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याने धरणक्षेत्र च्या पाण्यात कुणीही उतरू नये,व दुरूनच निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यावा असे आवाहन याप्रसंगी सिंचाई विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले.