तंटामुक्ती समिती खिर्डी च्या अध्यक्षपदी धनराज मालेकर यांची निवड

By : Mohan Bharti

गडचांदूर : ग्राम पंचायत खिरडी येथे तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदी धनराज मालेकर यांची बिनविरोध निवड झाली ग्राम पंचायत,खिर्डी येथे 26 ऑक्टोबर ला ग्राम सभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विविध समित्या स्थापन करण्यात आल्या. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून श्री. धनराज नत्थूजी मालेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदर सभेला प्रशासक श्री. लहामगे , ग्राम सेविका, सौ. उईके मॅडम, अंगणवाडी सेविका सौ. तोडासे मॅडम, पोलीस पाटील श्री रामदास तोडसे , तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही सभा ग्राम अध्यक्ष श्री. अशोक सेखू मडावी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ही निवड बिनविरोध झाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *