राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजनेतून ३६ लाभार्थ्यांना प्रत्येकी विस हजार रुपयांची मदत.

By : Mohan Bharti

आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते लाभार्थींना धनादेशाचे वितरण.

गोंडपिपरी :– राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजने अंतर्गत गोंडपिपरी तालुक्यांत एकूण ३६ लाभार्थ्यांना विस हजार रुपयांच्या (२०, ०००/-) धनादेशाचे वितरण आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी कृ. उ. बा. समिती गोंडपिपरीचे सुरेश चौधरी, नगराध्यक्ष अरुण धोटे, तहसीलदार के डी मेश्राम, प्रभारी गट विकास अधिकारी धनजेय साळवे, अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना विनोद नागपुरे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष देविदास सातपुते, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष बंडावार, अनुसूचीत जाती/जमातींचे अध्यक्ष गौतम झाडे, सचिन फुलझेले, आशीर्वाद पिपरे, महेद्र कुंगाटकर, सेवा कलश फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिजित धोटे, मडावी, कांबळे यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here