

लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,
गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची५३वी पुण्यतिथी चा २५ ऑक्टोबर ला घेण्यात आला त्या निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन आदरांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री.धर्मराज काळे होते त्यांनी राष्ट्रसंताच्या जिवन कार्याची विद्यार्थ्यांना माहिती सांगितली याप्रसंगी शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले स्पर्धेत ५ते१० वी च्या अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या कार्यक्रमात पर्यवेक्षक संजय गाडगे, ज्योती चटप, माधुरी उमरे,भालचंद्र कोंगरे,बि एम मरस्कोल्हे, सि एम किन्नाके, जीवन आडे,एस जी आत्राम ,बापुजी मेश्राम ई.उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन तथा आभार प्रदर्शन महेंद्रकुमार ताकसांडे यांनी केले ,यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.