वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा 3 सप्टेंबर ला गडचांदूर येथे भव्य सत्कार ,,,,,,,,,,,,, भाजप च्या वतीने कार्यक्रम आयोजित

 

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,
महाराष्ट्राचे वन, सांस्कृतिक कार्यक्रम तथा मत्स्यव्यवसाय मंत्री ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार येत्या 3 सप्टेंबर ला सायंकाळी 5 वाजता गडचांदूर शहरात येत असून स्थानिक लक्ष्मी मंगल कार्यालयात भाजप च्या वतीने भव्य सत्कार समारंभ व लाडुतूला कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सत्कार समारंभ च्या अध्यक्ष स्थानी माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री मा हंसराज अहिर राहतील, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार ऍड,संजय धोटे, सुदर्शन निमकर,माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे,खुशाल बोडे,उपस्थित राहणार आहेत,
सत्कार समारंभ ला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गडचांदूर शहर, तथा कोरपना तालुका भाजपच्या वतीने करण्यात आले आहेत,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *