अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने पूरग्रस्त गावात आरोग्य शिबिराचे आयोजन

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील नदीकाठा जवळील काही खेड्यांना जुलै मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे काही गावांना पुरामुळे फार हाल सहन करावे लागले, त्यांची 90 टक्के शेती पाण्याखाली गेली, गुरे वाहून गेली,अनेक सामाजिक संस्था, प्रशासन यांनी मदत पोहचवली त्यात अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुज मोझरी द्वारा संचालित श्री गुरुदेव सेवा मंडळ वणी तालुका, चंद्रपूर जिल्हा च्या वतीने मोफत कापड वाटप करण्यात आले होते. आणि गुरूदेव सेवा मंडळ गुरूकुंज द्वारा संचालित चंद्रपूर जिल्हा वणी तालुका यांचे वतीने 28 ऑगस्ट ला वणी तालुक्यातील पूरग्रस्त मौजा सेलू खुर्द येथे पूरग्रस्तांना आरोग्य सेवा पुरविण्याच्या दृष्टीने हृदयरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद शाळेत करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री .जे आर .आवारी ,सरपंच ग्रामपंचायत शेलु होते ,प्रमुख मार्गदर्शक म्हणून हरिभक्त पारायण ग्रामगीताचार्य विठ्ठलराव डाखरे महाराज ,वडगाव त.कोरपना,संजय ठावरी ,माजी प्राचार्य कोरपणा , बापूजी पाटील पिंपलकर राष्ट्रसंत प्रचार समितीचे उपाध्यक्ष बिबी ,सौ. विजयाताई दहेकर ग्रामगीताचार्य वणी, मारोतराव ठेंगणे साहेब सेवा अधिकारी वनी तालुका ,श्री दिलीपराव डाखरे ग्रामगीताचार्य नांदेपेरा तथा प्रचारक समिती वनी तालुका ,श्री प्रवीण भाऊ पेचे मध्यवर्ती प्रतिनिधी गुरुकुंज आश्रम मोझरी , मारोतराव पेचे संचालक पंचशील शिक्षण प्रसारक मंडळ नांदेपेरा,रविकांत वांढरे उपसरपंच ग्रामपंचायत सेलु ,सौ मंदाताई आवारी पोलीस पाटील सेलू,होते, आरोग्य शिबिराचे उद्घाटन डॉ.अमरीश बुक्कावार ,चंद्रपूर यांच्या हस्ते झाले, कार्यक्रमाचा प्रारंभ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राधा कृष्ण, व पुंजाराम महाराज यांचे यांच्या पूजनाने झाला, प्राचार्य ठावरी यांनी ग्रामगीतेचे जीवनात महत्व व आनंदी जीवनासाठी कसे आवश्यक आहे याबाबत प्रतिपादन केलं , पिंपळकर यांनी सुद्धा ओवीबद्ध मार्गदर्शन केलं. वर्षभरात 100 हून जास्त कीर्तन करणारे ह .भ. प. विठ्ठलराव डाखरे महाराज यांनी या कार्यक्रमाचे रूपरेषा आणि रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा आहेत असे प्रतिपादन केले , डॉ. बुक्कावार यांच्या सहकार्याने आरोग्य सेवा पुरविण्याचे एक भाग्य लाभल्याचं त्यांनी सांगितलं याप्रसंगी आयोजित शिबिरामध्ये 70 रुग्णांनी लाभ घेतला, सदर रुग्णांना शुगर, बीपी, ई सी जी, तपासणी करून औषधोपचार करण्यात आला काही किरकोळ आजारी रुग्णांनी याचा लाभ घेतला.. मोफत वैद्यकीय सेवा गावात प्राप्त झाल्याने रुग्णांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिगंबर आवारी यांनी, केले संचालन दिलीप डाखरे यांनी तर आभार युवराज आवारी यांनी मानले , राष्ट्रवंदनेने पुंजाराम महाराज मंदिरात सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीेतेसाठी रुपेश जोगी,सागर डोंगे, श्रीकांत पेंदोर, अरविंद मोहितकर, सुधाकर सूर्तेकर,भाऊराव नांदेकर, तथा समस्त ग्रांमवासी यांनी अथक परिश्रम घेतले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *