कोरपना तहसील कार्यालयातील लिपिक, एक खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात

By : Mohan bharti

कोरपना – येथील तहसील कार्यालयातील एका लिपिक व खासगी इसमाला याला अडीच हजार रुपयाची लाच घेताना मंगळवार दि.२६ ला दुपारी रंगेहाथ पकडण्यात आले. मौजा वनोजा येथील वर्ग दोन चे शेत वर्ग एक करण्याकरता समंधीत कागदपत्रांच्या नकल काढण्यासाठी तक्रारदार शेतकऱ्याला अव्वल कारकून विलास ठमके यांनी लाच मागितली होती.
तक्रारदार कडे लाचेचे केलेल्या पडताळणी कारवाई वरून मंगळवारी सापळा रचून कारवाईदरम्यान अव्वल कारकून विलास ठमके यांनी केलेल्या मागणीवरून खाजगी इसम प्रदीप आदे यांचे मार्फतीने ठमके याचे करिता लाच रक्कम म्हणून स्वीकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. दोन्ही आरोपींना तहसिल कार्यालय कोरपना येथील आवारात पकडण्यात आले. . ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त राजेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद तोतरे, पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांचे नेतृत्वात ना पो का संतोष येलपुल वार, रवींद्रकुमार ढेगळे, संदेश वाघमारे, वैभव गाडगे, सतीश सिडाम यानी केली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *